लग्नाची वरात घेऊन येणाऱ्या मिनी बसचा टायर फुटला, दहा वऱ्हाडी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 15:26 IST2023-04-24T15:21:26+5:302023-04-24T15:26:34+5:30

मिनी बस सावली तालुक्यातील गेवरा येथून लग्नकार्य आटोपून गावाच्या दिशेने निघाली होती

The tire of the mini bus carrying the groom bursts, injuring ten grooms | लग्नाची वरात घेऊन येणाऱ्या मिनी बसचा टायर फुटला, दहा वऱ्हाडी जखमी

लग्नाची वरात घेऊन येणाऱ्या मिनी बसचा टायर फुटला, दहा वऱ्हाडी जखमी

सावरगाव (चंद्रपूर) : नागभीड तालुक्यातील सावरगाववरून तीन किमी अंतरावर असलेल्या चिखलगाव फाट्याजवळ लग्न लागल्यानंतर वरात घेऊन येताना मिनी बसचा टायर फुटल्याने ती पलटी झाली. यात जवळपास दहा वऱ्हाडी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील वऱ्हाड घेऊन मिनी बस सावली तालुक्यातील गेवरा येथून लग्नकार्य आटोपून गावाच्या दिशेने निघाली होती. दरम्यान, चिखलगाव नांदगाव हे तीन किलोमीटर अंतर पार करण्यापूर्वी चिखलगावजवळ बसचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण जाऊन मिनी बस पलटली. यात दहा वऱ्हाडी जखमी झाले. हायवे पोलिस व तळोधी पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ दोन रुग्णवाहिकांतून सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींना दाखल केले. 

Web Title: The tire of the mini bus carrying the groom bursts, injuring ten grooms