कार-ट्रकचा भीषण अपघात, कारचालकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 15:17 IST2023-02-17T15:16:58+5:302023-02-17T15:17:39+5:30

मूल-चंद्रपूर मार्गावरील गोंडसावरीजवळील घटना

Terrible car-truck accident on mul chandrapur route, driver died on the spot | कार-ट्रकचा भीषण अपघात, कारचालकाचा जागीच मृत्यू

कार-ट्रकचा भीषण अपघात, कारचालकाचा जागीच मृत्यू

मूल (नागपूर) : मूल-चंद्रपूर मार्गावरील गोंडसावरी गावाजवळील वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक व कारची धडक बसल्याने कारचालक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.

पवन अनिल परसवाणी (२४) रा. कन्नमवार वार्ड वडसा देसाईगंज, जि. गडचिरोली असे मृत कारचालकाचे नाव आहे. मूलवरून चंद्रपूरकडे माल भरण्यासाठी जात असलेला ट्रकची (एमएच -०४ ईएल- ७१००) व चंद्रपूर येथील डॉक्टरकडे उपचार करून कारने परत येत असलेल्या पवनच्या कारची (एमएच-३३ व्ही -१९१४) समोरासमोर धडक बसली. यात पवनचा जागीच मृत्यू झाला.

पवन हा बुधवारीच चंद्रपूर येथील खासगी डॉक्टरांकडे उपचाराकरिता गेला होता. रात्री चंद्रपूरला मुक्काम करून पहाटे ५ वाजता गावाकडे परत येताना सदर अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की कारची समोरील बाजू पूर्ण दबल्याने पवन कारमध्येच दबून होता. घटनेची माहिती मिळताच मूल पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ट्रकचालक पांडुरंग रावसाहेब काळे यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध भादंवि २७९, ३०४ अ, मोटार वाहन कायदा १८४ नुसार मर्ग दाखल केला आहे.

Web Title: Terrible car-truck accident on mul chandrapur route, driver died on the spot