विद्यार्थ्यांनो; पोस्टाच्या स्टॅम्पचा संग्रह करा आणि शिष्यवृत्ती मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:37 IST2025-01-10T15:36:38+5:302025-01-10T15:37:38+5:30
Chandrapur : कसा करावा अर्ज? ; काय आहेत नियम?

Students; collect postage stamps and get scholarships!
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय पोस्ट विभागाने इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा ५०० प्रमाणे वार्षिक सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देणारी दीनदयाळ स्पर्श योजना सुरू कैली आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये पत्रव्यवहार करण्याची तसेच स्टॅम्पचा अभ्यास करून त्याचा संग्रह करण्याची आवड निर्माण होणे, हा योजनेचा उद्देश आहे. ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे. तसेच, छंद (फिलाटली) म्हणून टपाल तिकिटांचा संग्रह आणि त्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येते.
छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांची होणार निवड
पोस्ट विभागाच्या स्टॅम्पचा संग्रह करून त्याचा कॅटलॉग करणे. जुने स्टॅम्प शोधून त्यांचे जतन करून प्रदर्शन करणे, त्यावर अधिक संशोधन करणे, असे विविधांगी छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांची योजनेसाठी निवड केली जाते. शासकीय, खासगी शाळेतील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अर्ज कोण करू शकेल?
- कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत शिकणारा सहावी ते नववी इयत्तेतील विद्यार्थी अथया विद्यार्थिनी या योजनेसाठी अर्ज करू शकतो, सरकारी आणि खासगी दोन्ही शाळांमधील विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.
- शिष्यवृत्तीसाठी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून परीक्षा पास विद्यार्थी वोजनेसाठी पात्र आहेत. एससी, एसटी श्रेणीतील विद्याथ्यांसाठी ५५ टक्के गुण आवश्यक
काय आहेत नियम?
- प्रत्येक पोस्टल सर्कल इयत्ता सहावी ते नववी पर्यंतच्या प्रत्येकी २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते.
- मान्यताप्राप्त शाळांमध्ये शिकणाऱ्या नियमित विद्याथ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम दर तीन महिन्यांनी वितरित केली जाते.
- शिष्यवृत्तीसाठीची निवड एका वर्षांसाठी असते. पूर्वी निवडलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षीही शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो.
- शाळेमध्ये फिलाटली क्लब नसल्यास विद्याध्यचि स्वतःचे फिलाटली डिपॉझिट खाते विचारात घेतले जाते.