चंद्रपुरात 'फोटोफिनिश' निकालांनी मनपाची सत्तासमीकरणे ढवळली; १००, २०० मतांच्या आत किती उमेदवार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 19:03 IST2026-01-19T19:02:31+5:302026-01-19T19:03:41+5:30

Chandrapur : महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांत अनेक प्रभागांत अत्यल्प मतफरकाने निकाल लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तब्बल आठ जागांवर १०० मतांच्या आत, तर सहा जागांवर २०० मतांच्या आत निकाल लागले.

'Photofinish' results in Chandrapur shake up municipal power-sharing; How many candidates are within 100, 200 votes? | चंद्रपुरात 'फोटोफिनिश' निकालांनी मनपाची सत्तासमीकरणे ढवळली; १००, २०० मतांच्या आत किती उमेदवार?

'Photofinish' results in Chandrapur shake up municipal power-sharing; How many candidates are within 100, 200 votes?

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांत अनेक प्रभागांत अत्यल्प मतफरकाने निकाल लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तब्बल आठ जागांवर १०० मतांच्या आत, तर सहा जागांवर २०० मतांच्या आत निकाल लागले. या 'फोटोफिनिश' लढतींमुळे प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित झाले असून, याचा सर्वाधिक फटका भाजपला सहा जागांवर बसला आहे. काँग्रेसला चार, वंचित बहुजन आघाडीला दोन, मनसेला एक व उद्धवसेनेला एका जागेवर अशा प्रकारे कमी फरकाचे परिणाम भोगावे लागले.

अपक्ष दुसऱ्या क्रमांकावर; पक्षांसाठी धोक्याची घंटा

प्रभाग २ (शास्त्रीनगर - ड) मध्ये काँग्रेसचे सचिन कत्याल विजयी झाले असले तरी अपक्ष उमेदवार सुनील डोंगरे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. यामुळे मोठ्या पक्षांसाठी अपक्षांचे वाढते आव्हान स्पष्ट झाले आहे.

सत्ता स्थापनेचा पेच वाढला

अल्प मतफरकाने ठरलेले हे निकाल पाहता चंद्रपूर महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपला काही मतांनी जागा गमवाव्या लागल्याने संख्याबळ कमी झाले असून, काँग्रेस व इतर पक्षांनाही स्पष्ट वर्चस्व मिळालेले नाही. परिणामी अपक्ष व छोट्या पक्षांचे नगरसेवक 'किंगमेकर'च्या भूमिकेत आहेत. आगामी काळात युती, वाटाघाटी आणि राजकीय हालचालींना आणखी वेग येणार हे निश्चित आहे.

१०० मतांच्या आतले निकाल

  • प्रभाग क्र १३ (बाबूपेठ - अ): काँग्रेसचे विनोद लभाने विजयी; वंचित बहुजन आघाडीचे स्नेहल रामटेके पराभूत
  • प्रभाग ५ (विवेक नगर ड) काँग्रेसचे अभिषेक डोईफोडे विजयी; भाजपचे संदीप आवारी पराभूत
  • प्रभाग ४ (बंगाली कॅम्प ब) काँग्रेसच्या संगीता भोयर विजयी; मनसेचे सचिन भोयर पराभूत
  • प्रभाग १६ (हिंदुस्थान लालपेठ - क) : काँग्रेसच्या चंदा वैरागडे विजयी; भाजपच्या कल्पना बगुलकर पराभूत
  • प्रभाग ७ (जटपुरा - ड) : भाजपचे रवि लोनकर विजयी; उद्धवसेनेचे मोहम्मद शेख पराभूत
  • प्रभाग २ (शास्त्रीनगर - ब) : शिंदेसेनेचे डिलन केळझरकर विजयी; काँग्रेसच्या विद्या ठाकरे पराभूत
  • प्रभाग क्र १३ (बाबूपेठ - ड): काँग्रेसचे बालू उर्फ रामनरेश यादव विजयी; वंचित बहुजन आघाडीचे सुरेश गाडगे पराभूत
  • प्रभाग ११ (भानापेठ - क): काँग्रेसच्या सईदा शेख विजयी; भाजपच्या आशा आबोजवार पराभूत


२०० मतांच्या आतले निकाल

  • प्रभाग क्र १३ (बाबूपेठ - ब) : बसपच्या सोनिया उंदिरवाडे विजयी; भाजपच्या अश्विनी पिंपळशेंडे पराभूत
  • प्रभाग ६ (इंडस्ट्रियल इस्टेट क): काँग्रेसचे राजेश अडूर विजयी; भाजपचे महेश झिटे पराभूत
  • प्रभाग ५ (विवेक नगर अ) भाजपच्या पुष्पा उराडे विजयी; काँग्रेसचे शुभम दातार पराभूत
  • प्रभाग २ (शास्त्रीनगर अ) भाजपच्या शितल गुरनुले विजयी; काँग्रेसच्या अनुसया दहेगावकर पराभूत
  • प्रभाग ११ (भानापेठ - ड) : भाजपचे संजय कंचर्लावार विजयी; काँग्रेसचे पंकज आईंचवार पराभूत
  • प्रभाग १७ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ): काँग्रेसचेआकाश मानकर विजयी; भाजपचे रमेश पुलिपाका पराभूत


तिरंगी लढतींचा फटका; मतविभाजन ठरले निर्णायक

  • काही प्रभागांत तिरंगी व बहुरंगी लढती झाल्याने थेट फायदा एका उमेदवाराला झाला.
  • प्रभाग १५ मध्ये उद्धवसेना विजयी ठरली, तर शिंदेसेना व काँग्रेसची मते विभागली गेली.
  • प्रभाग १ मध्ये भाजपला तिरंगी लढतीचा फायदा झाला.

Web Title : चंद्रपुर में 'फोटोफिनिश' नतीजों से बदले समीकरण; करीबी मुकाबले निर्णायक

Web Summary : चंद्रपुर नगर निगम चुनाव में कांटे की टक्कर से सत्ता समीकरण बदल गए। बीजेपी को करीबी मुकाबलों में नुकसान हुआ। निर्दलीय मजबूत बनकर उभरे, जिससे गठबंधन की संभावनाएं जटिल हो गईं क्योंकि किसी भी दल को स्पष्ट बहुमत नहीं मिला। अब गठबंधन और बातचीत महत्वपूर्ण हैं।

Web Title : Photo-finish Chandrapur Municipal Elections Stir Power Equations; Close Races Decisive

Web Summary : Chandrapur's municipal election saw razor-thin margins, impacting power dynamics. BJP suffered most losses in very close races. Independents emerged strong, complicating coalition possibilities as no party achieved a clear majority. Alliances and negotiations are now crucial.