चंद्रपूर जिल्ह्यात उत्साहात मतदानाला सुरुवात, काही ठिकाणी EVMमध्ये अडचणी आल्याने मतदानाला उशीर

By राजेश भोजेकर | Published: April 19, 2024 08:53 AM2024-04-19T08:53:22+5:302024-04-19T08:54:17+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर अपवाद वगळता सकाळी सात वाजतापासून सुरळीतपणे मतदानाला सुरुवात झाली. चंद्रपूर जिल्हा हा नेहमी तापमानासाठी ओळखला जातो. या अनुषंगाने प्रशासनाने ही खबरदारी घेत मतदारांना सकाळी लवकरात लवकर मतदान (Voting) करून उन्हापासून बचाव करावा, असे आवाहन केले होते.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Voting started with excitement in Chandrapur district, delay in voting due to EVM problems in some places | चंद्रपूर जिल्ह्यात उत्साहात मतदानाला सुरुवात, काही ठिकाणी EVMमध्ये अडचणी आल्याने मतदानाला उशीर

चंद्रपूर जिल्ह्यात उत्साहात मतदानाला सुरुवात, काही ठिकाणी EVMमध्ये अडचणी आल्याने मतदानाला उशीर

चंद्रपूर - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर अपवाद वगळता सकाळी सात वाजतापासून सुरळीतपणे मतदानाला सुरुवात झाली. चंद्रपूर जिल्हा हा नेहमी तापमानासाठी ओळखला जातो. या अनुषंगाने प्रशासनाने ही खबरदारी घेत मतदारांना सकाळी लवकरात लवकर मतदान करून उन्हापासून बचाव करावा, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत काही भागात नागरिकांनी सकाळपासूनच उन्हाच्या भीतीमुळे मतदान केंद्रावर गर्दी केली होती. 

जिवती तालुक्यातील येल्लापूर मतदान केंद्र क्र. १८० वर कंट्रोल युनिट मशीनमध्ये इंव्हॅलीड दाखवत असल्याने मतदानाला सुमारे दीड तास उशिराने म्हणजे ८:२० वाजता  सुरुवात झाली. उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कोरपना तालुक्यातील बिबी येथील मतदान केंद्र क्रमांक 70 वर मतदारांनी पहाटेपासूनच केंद्रावर गर्दी केली होती. मतदानासाठी सर्वत्र रांगा लागलेल्या आहे.गडचिरोली-चिमूर मतदार संघातील चिमूर तालुक्यातील पळसगाव मतदान केंद्र क्र. २९० वर सुमारे अर्ध्या तासाने मतदानाला सुरुवात झाली.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Voting started with excitement in Chandrapur district, delay in voting due to EVM problems in some places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.