Lok Sabha Election 2019; मतदानासाठी उरले आता केवळ चारच दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:35 IST2019-04-07T00:32:03+5:302019-04-07T00:35:08+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. याला आता केवळ चार दिवस शिल्लक आहे.

Lok Sabha Election 2019; मतदानासाठी उरले आता केवळ चारच दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. याला आता केवळ चार दिवस शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी जिल्ह्यातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी यांची शनिवारी आढावा बैठक घेत विविध मार्गदर्शक सूचना दिल्या. या सूचनांचे गांभीर्याने पालन करण्याची सक्त ताकीदही दिली.
यावेळी त्यांनी मतदान यंत्रणेतील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भातील सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मतदान केंद्रावरील महत्त्वाच्या सुविधा तपासणे, निवडणूक प्रक्रियेत येणाºया विविध अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांवरही चर्चा केली.
शेवटच्या ४८ तासांमध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांना असणारे विशेषाधिकार तसेच सुरक्षा उपाययोजना आणि संवेदनशील मतदान केंद्र अशा विविध विषयांवर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी अधिकाºयांशी संवाद साधला. तत्पूर्वी राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत विकसित केलेल्या आज्ञावलीच्या माध्यमातून अहवाल सादर करण्याचे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी यांना देण्यात आले. त्यामध्ये क्षेत्रीय अधिकाºयांना मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशीचा कृती अहवाल आज्ञावलीद्वारे सादर करायचा असून त्याचे प्रशिक्षण मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित अधिकाºयांना देण्यात आले. प्रशिक्षणाला सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
निवडणूक निरीक्षकांनी घेतला प्रशिक्षणाचा आढावा
निवडणुकीसंदर्भात प्रशिक्षणाचा आढावा घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक दिपांकर शर्मा यांनी उपविभागीय क्षेत्र मूल येथील निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला भेट दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडेकर उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला होणाºया मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडाव्या. याकरिता निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागामार्फत प्रशिक्षण देणे सुरूच आहे. त्या दरम्यान मतदान यंत्र हाताळणे, मतदान केंद्रांची सुरक्षा आणि अन्य मतदान प्रक्रिया योग्यरित्या हाताळण्याचे प्रशिक्षण यादरम्यान देण्यात येत आहे. उपविभागीय क्षेत्रासाठी सुरू असलेल्या या प्रशिक्षणाचा आढावा घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक दिपांकर सिन्हा यांनी उपविभागीय कार्यालय मूल येथील प्रशिक्षणस्थळी भेट दिली आणि प्रशिक्षक तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी कर्मचाºयांना प्रोत्साहित केले. यावेळी निरीक्षकांचे संपर्क अधिकारी व्ही.एम.वाकूळकर उपस्थित होते.