Lok Sabha Election 2019; स्ट्राँगरुमध्ये ईव्हीएम मशीन सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:30 IST2019-04-12T22:29:10+5:302019-04-12T22:30:41+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर गुुरुवारी रात्री विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयात जमा करण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन संच शुक्रवारी सर्व ठिकाणावरुन चंद्रपूर येथील एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाममध्ये आणण्यात आल्या.

Lok Sabha Election 2019; स्ट्राँगरुमध्ये ईव्हीएम मशीन सील
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीनंतर गुुरुवारी रात्री विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयात जमा करण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन संच शुक्रवारी सर्व ठिकाणावरुन चंद्रपूर येथील एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाममध्ये आणण्यात आल्या. त्यानंतर संबंधित उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मशीन सील करण्यात आल्या. दरम्यान, या ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. २३ मे रोजी येथेच मतमोजणी होणार आहे.
वणी आणि आर्णी येथील ईव्हीएम मशीन रात्री उशीरापर्यंत सील करण्यात आल्या नसल्याची चर्चा दिवसभर गावात होती. दरम्यान यासंदर्भात प्रशासनाकडे संपर्क साधला असता, सदर मशीन शुक्रवारी दुपारी आल्यामुळे त्या सील करण्यास उशीर झाल्याची माहिती मिळाली.
यावेळी निरीक्षक दिपांकर सिन्हा, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, निवडणूक उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.