दोन मतदार ओळखपत्र ठेवाल तर थेट तुरुंगामध्ये जाल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 19:38 IST2025-08-20T19:37:42+5:302025-08-20T19:38:44+5:30
Chandrapur : दुबार नाव रद्द करण्याची प्रक्रिया उपलब्ध

If you have two voter ID cards, you will go straight to jail!
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: मागील काही दिवसांपासून देशात मतदार आणि मतदान यावर चर्चा रंगत मतदार कार्ड असल्याचे आहे. काही मतदारांकडे दोन आढळून येते. निवडणूक विभागाकडून वेळोवेळी दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात येतात; परंतु, छायाचित्र ओळखपत्र तसेच राहते. यामुळे नागरिकांकडे दोन ओळखपत्र आढळतात.
एकाच मतदाराने दोन मतदार कार्ड वापरणे कायद्याने गुन्हा आहे. दोन ओळखपत्र आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे मतदारांनी एकाच ठिकाणी असलेले आपले मतदान कायम ठेवून अन्य ठिकाणी असलेले मतदार यादीतून नाव काढून घ्यावे. ऑनलाइन अॅपद्वारे अर्ज दाखल करून मतदार यादीतील दुबार नाव व ओळखपत्र रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते. अनेक नागरिकांची शहरात व गावाकडे अशा दोन ठिकाणी मतदार यादीत नावे असतात.
गुन्हा दाखल होऊ शकतो
दोन किंवा त्यापेक्षा अधिक मतदार ओळखपत्र असेल तर अशांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.
अर्ज करणे आवश्यक
एकाच नागरिकाकडे दोनपेक्षा अधिक ओळखपत्र किंवा दोन मतदार याद्यांमध्ये नाव असल्यास हे रद्द करण्यासाठी मतदाराला फॉर्म-७ भरणे गरजेचे आहे. ही प्रोसेस ऑनलाइन पद्धतीने केली जाऊ शकते. सर्व माहिती योग्य भरल्यास काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. यानंतर निवडणूक आयोग एक ओळखपत्र रद्द करते. जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासोबतच जर दोन मतदान कार्ड असेल तर एक रद्द करून घेणे महत्त्वाचे आहे.
ऑनलाइन सुविधा
एका व्यक्तीकडे दोनपेक्षा अधिक ओळखपत्र किंवा दोन मतदार याद्यांमध्ये नाव असल्यास ते रद्द करण्यासाठी मतदाराला फॉर्म-७ भरणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून करता येते.