पाच वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार; नराधमास ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2022 16:00 IST2022-11-24T15:56:29+5:302022-11-24T16:00:43+5:30

दोन दिवसांची पोलीस कोठडी

Five-year-old girl sexually assaulted by neighbour in chandrapur, arrests | पाच वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार; नराधमास ठोकल्या बेड्या

पाच वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार; नराधमास ठोकल्या बेड्या

नवरगाव (चंद्रपूर) : पोलीस स्टेशन सिंदेवाहीअंतर्गत इंदिरानगर, रत्नापूर येथील एका युवकाने घराशेजारील पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. बुधवारी दोन दिवसांनी मुलीची आंघोळ करून देताना आईला संशय आल्याने ही घटना उघडकीस आली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज डी. कुंभरे (२१, रा. इंदिरानगर, रत्नापूर) याने दोन दिवसांपूर्वी शेजारी राहाणाऱ्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केला. मुलगी लहान असल्याने कुणालाही काही सांगितले नाही. दोन दिवसांनंतर मुलीची आंघोळ करून देताना आईच्या लक्षात ही बाब आली आणि मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस विभागाकडे तक्रार दाखल केली.

सिंदेवाही येथील पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी घटनास्थळी येऊन अधिक तपास केला व आरोपी सूरज कुंभरे याला ताब्यात घेतले. मुलीला चंद्रपूर येथे नेऊन वैद्यकीय तपासणी केली व आरोपीवर ३७६ व पाॅस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास घारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Web Title: Five-year-old girl sexually assaulted by neighbour in chandrapur, arrests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.