चंद्रपूरचे भूमिपुत्र उलगडणार सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे तथ्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:50 IST2025-01-17T10:49:24+5:302025-01-17T10:50:11+5:30

Chandrapur : निवृत्त न्यायाधीश मदनलाल टहलियानी यांच्याकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची जबाबदारी

Chandrapur's Bhoomiputra will reveal the truth behind Sarpanch Santosh Deshmukh's murder | चंद्रपूरचे भूमिपुत्र उलगडणार सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे तथ्य

Chandrapur's Bhoomiputra will reveal the truth behind Sarpanch Santosh Deshmukh's murder

राजेश मडावी 
लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
२६/११ मुंबई बॉम्बस्फोटातील अतिरेकी अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावणारे निवृत्त न्यायाधीश मदनलाल टहलियानी यांच्याकडे मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची जबाबदारी देऊन फडणवीस सरकारने पुन्हा एकदा चंद्रपूरच्या भूमिपुत्रावर विश्वास टाकला आहे. २०१५ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची राज्याच्या लोकायुक्तपदी नियुक्त झाली होती. या पदावरूनही त्यांनी निष्पक्ष न्याय दिल्याच्या अनेक आठवणी आहेत.


मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मदनलाल टहलियानी हे मूल येथील रहिवासी आहेत. त्यांचा कौटुंबिक गोतावळा याच शहरात राहून विविध क्षेत्रांत विधायक योगदान देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही विद्यार्थी जीवन याच शहरात गेले. मुख्यमंत्र्यांच्या काकू व माजी राज्यमंत्री शोभाताई फडणवीस यांचे मूल हे कार्यक्षेत्र हे विशेष. निवृत्त न्यायाधीश टहलियानी यांनी गोंदिया येथून एलएलबी झाल्यानंतर प्रारंभी अॅड. दादा देशकर यांच्या मार्गदर्शनात वकिली सुरू केली. १९७९ च्या सुमारास गडचिरोली, सिरोंचा, देसाईगंज व वरोरा येथे सरकारी वकील म्हणून कार्यरत होते.


५० रुपयांत दिला न्याय 
२०१५ मध्ये चंद्रपूरचे एक मुख्याध्यापक अचानक बेपत्ता झाले. त्यांच्या पत्नीने तत्कालीन सीईओंकडे आर्थिक मोबदला व निवृत्तीवेतनाचा दावा दाखल केला. मात्र 'या प्रकरणात भारतात कुठेही न्याय मिळणार नाही' असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याने ती हादरली. अखेर सर्व कागदपत्रे घेऊन मूल येथे न्यायाधीश बंधूंच्या घरी गेली. ती कागदपत्रे लोकायुक्तांकडे पोस्टाने केवळ ५० रुपयांत लोकायुक्तांकडे पाठवली. अखेर २० दिवसांतच निकाल दिला. मुख्याध्यापकांच्या पत्नीला १३ लाखांचा मोबदला मिळाला. आता १३ हजार रुपये पेन्शन मिळत आहे.

Web Title: Chandrapur's Bhoomiputra will reveal the truth behind Sarpanch Santosh Deshmukh's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.