Chandrapur Election Results 2026 : चंद्रपूर महापालिका निवडणूक निकाल : माजी महापौर राखी कंचर्लावार पराभूत; दिग्गजांनाही नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 14:40 IST2026-01-16T14:39:52+5:302026-01-16T14:40:19+5:30
Chandrapur : महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला असून, या निकालामुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Chandrapur Election Results 2026 : Former Mayor Rakhi Kancharlawar Defeated; Even Veterans Rejected
चंद्रपूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला असून, या निकालामुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रपूरच्या माजी महापौर आणि भाजपच्या उमेदवार राखी कंचर्लावार यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे.
याचबरोबर काँग्रेसच्या बंडखोर व माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया यांनाही मतदारांनी नाकारले असून त्यांचा पराभव झाला आहे. तसेच भाजपचे दिग्गज उमेदवार देवानंद वाढई यांनाही निवडणुकीत अपयश आले आहे.
या निकालामुळे चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दिग्गज उमेदवारांच्या पराभवामुळे भाजपसह इतर पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून, महापालिकेतील आगामी सत्तासमीकरणांवरही या निकालाचा मोठा प्रभाव पडणार आहे. निवडणूक निकालानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.