चारित्र्याच्या संशयावरून बायकोची कुऱ्हाडीने निघृण हत्या, दोन मुलींवरही केले वार
By परिमल डोहणे | Updated: June 6, 2023 10:29 IST2023-06-06T10:28:40+5:302023-06-06T10:29:34+5:30
पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी येथील घटना

चारित्र्याच्या संशयावरून बायकोची कुऱ्हाडीने निघृण हत्या, दोन मुलींवरही केले वार
चंद्रपूर : चरित्र्यावर संशय घेवून झोपेत असलेल्या बायकोवर कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. तर झोपेत असलेल्या दोन मुलींवरही कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना पोंभुर्णा तालुक्यातील डोंगर हळदी (माल) येथे मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.
आशा मनोज लेनगुरे (४०) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर अंजली मनोज लेनगुरे (१७), पुनम मनोज लेनगुरे (१२) असे जखमी मुलींचे नाव आहे.दोन्ही मुलींवर चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोन्ही मुलींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती उमरी पोतदार येथील पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी मृतकाचा पती मनोज लेनगुरे (४०) याला ताब्यात घेतले आहे
पुढील तपास उमरी पोतदार पोलिस करीत आहेत.