चंद्रपुरात १६ प्रभागांमध्ये असणार 'बिग फाइट'; आजी-माजी नगरसेवक, महापौर व सभापतीदेखील रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:44 IST2026-01-12T18:43:28+5:302026-01-12T18:44:54+5:30

Chandrapur : महापालिकेच्या ६६ जागांसाठी सर्वच पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली. सत्ता मिळविण्यासाठी तुल्यबळ उमेदवार दिले आहेत.

'Big Fight' to be held in 16 wards in Chandrapur; Former and current corporators, mayor and speaker also in the fray | चंद्रपुरात १६ प्रभागांमध्ये असणार 'बिग फाइट'; आजी-माजी नगरसेवक, महापौर व सभापतीदेखील रिंगणात

'Big Fight' to be held in 16 wards in Chandrapur; Former and current corporators, mayor and speaker also in the fray

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
महापालिकेच्या ६६ जागांसाठी सर्वच पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली. सत्ता मिळविण्यासाठी तुल्यबळ उमेदवार दिले आहेत. १७ पैकी १६ प्रभागांमध्ये आजी-माजी नगरसेवक, महापौर व सभापतिदेखील रिंगणात उतरल्याने 'बिग फाइट' होणार असल्याचे चित्र आहे.

चंद्रपूर मनपा निवडणुकीत ४५१ उमेदवार मैदानात उतरले आहेत. भाजप व काँग्रेसकडून उमेदवारी नाकारलेले माजी नगरसेवकांसोबत इच्छुकांनीही अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे काही प्रभागांत पक्षांतर केलेले नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा विचार केल्यास बंडखोरीचे प्रमाण यावेळी सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले. आपल्याचा पक्षातील उमेदवार अपक्ष म्हणून आव्हान निर्माण केल्याने दिग्गज उमेदवारांना घाम फुटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपमधील बंडखोरांची संख्या अधिक आहे. त्याचा पटका बसू नये, यासाठी पक्षाने प्रभागातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रभावशाली व्यक्तींच्या घरी बैठका सुरू केल्या आहेत.

दोन टप्प्यांत दारोदारी प्रचार

कोणत्याही अपेक्षेविना प्रचारासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांचा जमाना आता संपला आहे. निवडणुकीत प्रचारासाठी उमेदवारांसोबत पायाला भिंगरी बांधून फिरणाऱ्या सर्वसामान्य महिलांना या निमित्ताने हंगामी रोजगार मिळाला आहे. सकाळी व दुपारनंतर अशा दोन टप्प्यांतील महिलांना दिवसाला ४०० रुपये भत्ता उमेदवारांकडून दिला जात आहे. घरी राहण्यापेक्षा चार पैसे मिळतील, या अपेक्षेने गरजू महिला प्रचारात उतरल्या आहेत.

आमदार व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे नातेवाईकही मैदानात

निवडणूक लढविणाऱ्या ४५१ उमेदवारांमध्ये यंदा उच्चशिक्षित तरुण उमेदवारांची संख्या मोठी आहे. मात्र, पक्षांनी उमेदवारी देताना नातेवाईक, हितसंबंध व पदाधिकाऱ्यांना संधी दिली. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचे चुलतबंधू सुरेंद्र अडबाले हे नगिनाबाग गट ब मधून काँग्रेसकडून रिंगणात आहेत. बहुतांश राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे नातेवाईक उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

भाजपच्या उमेदवारीवरून मोठ वाद होऊनही माजी महापौर राखी कंचर्लावार व संजय कंचर्लावार हे दाम्पत्य भानापेठ तसेच वडगाव प्रभागातून उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाले. राकाँ (शरद पवार) च्या शहराध्यक्ष बेबी उईके या स्वतः एमईएल ड. प्रभागात निवडणूक लढवत आहेत, तर पती लोमेश उईके यांना काँग्रेसने एमईएल 'ब'मधून रिंगणात उतरविले.


अशा आहेत चंद्रपुरातील लक्षवेधी लढती
प्रभाग                                                                       उमेदवार

वडगाव गट 'क'.:                    राखी कंचर्लावार (भाजप)                      संगीता वाढई (राका अजित पवार)
वडगाव गट 'अ':                     सुनीता लोढिया (अपक्ष)                         सोनल देवतळे (भाजप)
वडगाव गट 'ड' :                    पप्पू देशमुख (भाशेकाप)                        देवानंद वाढई (भाजप)
दे. गो. तुकूम गट 'ब' :             अनिल फुलझेले (भाजप)                        आशिष बोंडे (काँग्रेस)
विवेकनगर गट 'ब':                 अंजली घोटेकर (भाजप)                         सुनंदा धोबे (काँग्रेस)
विवेकनगर गट 'ड':                  संदीप आवारी (भाजप)                        अभिषेक डोईफोडे (काँग्रेस)
जटपुरा गट 'ड' :                    रवी आसवानी (शिंदेसेना)                        रवी लोणकर (भाजप)
नगिनाबाग गट 'ब' :                 सुरेंद्र अडबाले (काँग्रेस)                        सतीश मालेकर (उद्धवसेना)
नगिनाबाग गट 'ड' :                    राहुल पावडे (भाजप)                         स्वप्निल कांबळे (काँग्रेस)
एकोरी गट 'ड' :                 दीपक जयस्वाल (राकाँ अजित पवार)           मोहम्मद सोईल इस्माईल (काँग्रेस)
भानापेठ गट 'ड' :                  संजय कंचर्लावार (भाजप)                       पंकज आईचवार (काँग्रेस)
एकोरी गट 'अ' :                 अशोक नागापुरे (रााँ अजित पवार)               राजु येले (भाजप)
महाकाली गट 'ब':                 संगीता अमृतकर (काँग्रेस)                        अविता लडके (भाजप)
महाकाली गट 'क':                    रितेश तिवारी (काँग्रेस)                         प्रज्वलंत कडू (भाजप)
महाकाली गट 'ड' :                    नंदू नागरकर (अपक्ष)                         संतोष लहामगे (काँग्रेस)
भिवापूर गट 'ब' :                     वसंत देशमुख (भाजप)                          अमोल शेंडे (काँग्रेस)

Web Title : चंद्रपुर नगर निगम चुनाव: प्रमुख उम्मीदवारों के साथ 'बिग फाइट' की उम्मीद

Web Summary : चंद्रपुर नगर निगम चुनाव में पूर्व पार्षदों, महापौरों और अध्यक्षों के चुनाव लड़ने के साथ एक भयंकर लड़ाई देखी जा रही है। कई लोग पार्टियों के भीतर से चुनौतियों का सामना करते हैं। उम्मीदवार प्रचार के लिए महिलाओं को दैनिक वेतन देते हैं। राजनेताओं के रिश्तेदार भी चुनाव लड़ रहे हैं। प्रमुख लड़ाइयों में वड़गांव, दे. गो. तुकुम और विवेक नगर वार्डों में मुकाबले शामिल हैं।

Web Title : Chandrapur Municipal Elections: 'Big Fight' Expected with Key Candidates in Fray

Web Summary : Chandrapur's municipal election witnesses a fierce battle with former corporators, mayors, and chairpersons contesting. Many face challenges from within parties. Candidates offer daily wages to women for campaigning. Relatives of politicians are also contesting. Key battles include contests in Wadgaon, De. Go. Tukum, and Vivek Nagar wards.