चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 13:19 IST2023-09-26T13:18:54+5:302023-09-26T13:19:26+5:30
त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती.

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरवर हल्ला
चंद्रपूर : येथील वैद्यकीय महाविद्यालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरवर रुग्णांच्या नातेवाईकाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री 11.15 वाजताच्या सुमारास घडली. रोहित होरे (27) असे जखमी रुग्णाचे नाव आहे. घटनेची माहिती महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मिळतात त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती.
सोमवारी रोहित होरे हा अपघात विभागात अपघाताच्या जखमेवर उपचार करत होता. दरम्यान आठ वर्षीय मुलीला घेऊन एक पालक आले. तिच्या पोटात दुखत होते. यावेळी त्या पालकांने डॉक्टर रोहित होरेला शिवीगाळ करून त्याला मारहाण केली. डॉक्टर रोहित संधी साधून बाहेर पळाला. यावेळी सोबतचे सहकारी डॉक्टर त्याच्याकडे आले. त्यांनी लगेच शहर पोलिसांना माहिती दिली. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजपूत लगेच आपल्या चमुंसह वैधकीय महाविद्यालयात हजर झाले. वृत्तही लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. परंतु सर्व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती.