चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालये आज बंद; जिल्हाधिकारी यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 10:49 IST2025-09-25T10:48:30+5:302025-09-25T10:49:09+5:30
ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये आज सकाळपासून वर्ग सुरू झाले आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांची व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन सकाळी ११ वाजेपर्यंत तत्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालये आज बंद; जिल्हाधिकारी यांचे निर्देश
चंद्रपूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी आज गुरुवारी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये आज सकाळपासून वर्ग सुरू झाले आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांची व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन सकाळी ११ वाजेपर्यंत तत्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या संदर्भात सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO) व गटशिक्षणाधिकारी (BEO) यांना आवश्यक ती तातडीची कारवाई करून सूचना प्रसारित करण्यास सांगण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, हवामानातील प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेता सावधगिरी बाळगावी व अनावश्यक प्रवास टाळावा.