रुग्णालयाच्या शौचालयात आढळले दोन महिन्याचे अर्भक; आरोग्य विभागात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 11:47 IST2022-12-15T11:45:45+5:302022-12-15T11:47:53+5:30
राजुरा ग्रामीण रुग्णालयातील घटना

रुग्णालयाच्या शौचालयात आढळले दोन महिन्याचे अर्भक; आरोग्य विभागात खळबळ
राजुरा (चंद्रपूर) : राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शौचालयात बुधवारी दोन महिन्याचे अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राजुरा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी गर्दी पहायला मिळते. दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातील वाॅर्ड नंबर १ मधील शौचालय चोकअप झाले. त्यामुळे बुधवारी सफाई कामगार साफसफाई करण्यास गेला असता त्याला दोन महिन्यांचे अपरिपक्व अर्भक आढळून आले. लगेच त्यांनी ही माहिती उपस्थित डॉक्टरांना सांगितली. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश कुडमेथे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला आहे.