ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; शिक्षकाचा मृत्यू
By परिमल डोहणे | Updated: October 13, 2023 19:40 IST2023-10-13T19:40:31+5:302023-10-13T19:40:41+5:30
बरांज-तांडा मार्गावरील घटना

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; शिक्षकाचा मृत्यू
चंद्रपूर : दुचाकीने जाणाऱ्या शिक्षकाला ट्रॅक्टर चालकाने मागून धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी भद्रावती-चंदनखेडा मार्गावर बरांज तांड्याजवळ घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सोनू पोतराजे (३०, रा. बोंथाळा) असे अटकेतील ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
सुनील गोविंद बरडे राहणार भद्रावती असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते घमाबाई प्राथमिक आश्रम शाळा बरांज तांडा येथे शिक्षक होते. ते आपल्या मोटारसायकलने भद्रावतीकडे येत असताना मागवून येणाऱ्या एमएच ३४-ऐआर ६१५८ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने धडक दिली. यात शिक्षकाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास ठाणेदार बिपीन इंगळे करीत आहेत.