बापरे! क्षणार्धात पत्त्यांसारखी कोसळली ३ मजली इमारत; एक महिला ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

By परिमल डोहणे | Updated: September 30, 2022 18:26 IST2022-09-30T17:11:04+5:302022-09-30T18:26:25+5:30

चंद्रपुरातील घुटकाळा वॉर्डातील घटना

A three-storey building collapsed in Chandrapur; a woman is reported to buried under rubble | बापरे! क्षणार्धात पत्त्यांसारखी कोसळली ३ मजली इमारत; एक महिला ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

बापरे! क्षणार्धात पत्त्यांसारखी कोसळली ३ मजली इमारत; एक महिला ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

चंद्रपूर : शहरात तीन मजली जुनी इमारत क्षणार्धात कोसळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. इमारतीमध्ये राहणारी एक महिला मलब्याखाली अडकल्याची माहिती असून शहर पोलिसांच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. मागील एक महिन्यापूर्वी घुग्घुस येथील एक अख्खे घरच जमिनीखाली ५० फूट गेले होते.

शहरातील घुटकाळा वाॅर्ड परिसरात असलेल्या तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील एका गल्लीत पुंडलिक पाटील नामक एक व्यक्तीची जुनी तीन मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये एक महिला राहत असल्याची माहिती आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली.

घटनेची माहिती पसरताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली. यावेळी एक महिला मलब्याखाली अडकल्याचे समोर येताच त्यांनी जेसीबीच्या साह्याने त्या महिलेला मलब्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू होते. वृत्त लिहीपर्यंत महिलेला मलब्यातून बाहेर काढण्यात आले नव्हते.

Web Title: A three-storey building collapsed in Chandrapur; a woman is reported to buried under rubble