‘त्या’ दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; माजरी येथील मातीच्या ढिगाऱ्यात दबून मृत्यू प्रकरण 

By परिमल डोहणे | Updated: June 22, 2023 19:54 IST2023-06-22T19:54:36+5:302023-06-22T19:54:55+5:30

माजरी-कोंढा मार्गावरील चालबर्डी येथे अनिल मत्ते व विजय मत्ते यांच्यात रस्त्यावर टाकलेल्या मातीवरून वाद होवून धक्काबुक्की झाली.

A case of culpable homicide has been filed against them A case of death due to burial in a mudslide at Majri | ‘त्या’ दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; माजरी येथील मातीच्या ढिगाऱ्यात दबून मृत्यू प्रकरण 

‘त्या’ दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; माजरी येथील मातीच्या ढिगाऱ्यात दबून मृत्यू प्रकरण 

चंद्रपूर : माजरी-कोंढा मार्गावरील चालबर्डी येथे अनिल मत्ते व विजय मत्ते यांच्यात रस्त्यावर टाकलेल्या मातीवरून वाद होवून धक्काबुक्की झाली. दरम्यान सरपंचानी येवून वाद सोडवित विजय मत्ते यांना माती रस्त्यावरून हटविण्यास सांगितले. माती हटवितांना अनिल मत्ते हा मातीच्या ढिगाखाली पडून असल्याचे डोजर चालकांच्या व विजय मत्ते लक्षात न आल्याने मातीखाली येवून अनिल मत्तेचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी डोजर चालक मंगेश उपरे व विजय मत्ते यांच्याविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. विजय मत्ते व अनिल मत्ते यांच्यात झालेल्या झटापटीत अनिल हा बेशुध्द होवून मातीच्या ढिगाऱ्यावर पडून होता. माती हटवितांना विजय मत्ते व डोजर चालक मंगेश उपरे यांनी मातीवर कुणी आहे का नाही याची शहानिशा करणे गरजेचे होते. मात्र, शहानिशा न केल्यामुळे अनिल मातीखाली येवून मृत्यू झाला. त्यामुळे मंगेश उपरे व विजय मत्ते यांच्याविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. पुढील तपास माजरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अजित देवरे करीत आहेत.

Web Title: A case of culpable homicide has been filed against them A case of death due to burial in a mudslide at Majri