गणेश विसर्जनादरम्यान पडोलीत २९८ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त

By परिमल डोहणे | Updated: September 7, 2025 19:09 IST2025-09-07T19:09:33+5:302025-09-07T19:09:41+5:30

दोघांना बेड्या : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

298 grams of brown sugar seized in Padoli during Ganesh immersion | गणेश विसर्जनादरम्यान पडोलीत २९८ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त

गणेश विसर्जनादरम्यान पडोलीत २९८ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त

चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने पडोली चौक येथे शनिवारी २९८ ग्रॅम बाऊनशुगर / हिरॉईन जप्त करत दोन आरोपीला अटक केली आहे या कारवाई मध्ये पोलिसांनी ब्राऊन शुगर / हिरॉईन, कार, रोख रक्कम व मोबाईल असा एकुण ३०लाख १९हजार ५५०/- रु.चा मुद्देमाल जप्त केला असून या ब्राऊन शुगर तस्करीचा मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगात फिरवायला सुरुवात केली आहे. नितीन उर्फ छोटू शंकर गोवर्धन (४२) महात्मा फुले वॉर्ड बाबूपेठ, साहिल सतीश लांबूदरवार (२३) रा. भिवापूर वॉर्ड चंद्रपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत. 

शनिवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी चंद्रपूर शहरात मोठी मिरवणूक निघाली होती. शहरातील नागरिक रस्त्यावर उतरत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत होते. व पोलीसही सुरक्षेसाठी तैनात होती. याच संधीचा फायदा घेत अमली पदार्थ विकणाऱ्या तस्करांनी ब्राऊन सुगर तस्करीचा बेत आखला. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहिती काढली दरम्यान पडोली परिसरात छोटु गोवर्धन नामक इसम हा त्याची कार क्र.एम.एच. ३४-बीआर-७७६५ ने चंद्रपूर शहरात ब्राऊन शुगर (गर्द) ड्रग्ज पावडर विक्री करीता घेवुन येणार आहे.

अशा माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली चौक येथे गोवर्धन यांच्या वाहनाची झडती घेतली असता त्याचा वाहनातून ब्राऊन शुगर गर्द पावडर आढळून आले त्यानंतर पोलिसांनी नितीन उर्फ छोटु शंकर गोवर्धन  याला ताब्यात घेऊन २९८ ग्रॅम ब्राऊन शुगर / हिरॉईन जप्त केले या कारवाई छोटू गोवर्धन व त्याचा सहकारी साहिल सतिश लांबदुरवार याला अटक करण्यात आली.  

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पडोलीचे पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, एलसीबीचे एपीआय दीपक काँक्रेडवार, बलराम झाडोकर, पीएसआय संतोष निंभोरकर, विनोद भुरले, सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार, धनराज कारकाडे, स्वामी चालेकर, नितीन रायपूरे, चेतन गज्जलवार, गणेश मोहुले, गणेश भोयर, जयसिंग, सुरेंद्र महतो आदींनी केली.

Web Title: 298 grams of brown sugar seized in Padoli during Ganesh immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.