lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > कमाईची सुवर्ण संधी; EV चार्जर बनवणाऱ्या कंपनीचा IPO येणार, पाहा डिटेल्स...

कमाईची सुवर्ण संधी; EV चार्जर बनवणाऱ्या कंपनीचा IPO येणार, पाहा डिटेल्स...

Upcoming IPO: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यासांठी कमाईची चांगली संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 05:36 PM2024-02-21T17:36:19+5:302024-02-21T17:37:07+5:30

Upcoming IPO: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यासांठी कमाईची चांगली संधी आहे.

Upcoming IPO: Golden Opportunity for Earnings; EV charger manufacturer to launch IPO | कमाईची सुवर्ण संधी; EV चार्जर बनवणाऱ्या कंपनीचा IPO येणार, पाहा डिटेल्स...

कमाईची सुवर्ण संधी; EV चार्जर बनवणाऱ्या कंपनीचा IPO येणार, पाहा डिटेल्स...

Upcoming IPO: तुम्ही शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. गेल्या काही वर्षांपासून EV वाहनांचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. याच EV वाहनांसाठी चार्जर बनवणारी कंपनी आपला IPO घेऊन येत आहे. Exicom Tele-Systems Limited, असे या कंपनीचे नाव असून, येत्या 27 फेब्रुवारी रोजी कंपनीचा IPO येईल. कंपनीने अद्याप आयपीओची किंमत, इश्यू साईज आणि इतर माहिती दिलेली नाही. 

IPO 27-29 फेब्रुवारी रोजी येणार
मिळालेल्या माहितीनुसार, हा IPO 27-29 फेब्रुवारीदरम्यान असेल. अँकर (मोठे) गुंतवणूकदार 26 फेब्रुवारी रोजी यासाठी बोली लावू शकतील. IPO मध्ये 329 कोटी रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि प्रमोटर्स नेक्स्टवेव्ह कम्युनिकेशन्सच्या 70.42 लाख इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे. कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE वर लिस्ट केले जातील.

कंपनी काय करते?
Exicom-Tele Systems ही पॉवर मॅनेजमेंट सोल्यूशन्स प्रदाता आहे. हे EV (इलेक्ट्रिकल व्हेईकल) चार्जर सोल्युशन्स बिझनेस आणि पॉवर सोल्युशन्स बिझनेस व्यवसाय कार्यरत आहे. ही कंपनी 1994 पासून कार्यरत आहे. कंपनीने भारतात 6000 AC आणि DC चार्जर लावले आहेत.

(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Upcoming IPO: Golden Opportunity for Earnings; EV charger manufacturer to launch IPO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.