Share Market Closing : भारतीय शेअर बाजारात सोमवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. जागतिक तणाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. BSE Sensex ६३९.४२ अंकांनी वाढून ७७,३०३.६३ वर बंद झाला, तर Nifty 50 १९५ अंकांनी वाढून २४,०९२.७० वर बंद झाला.
याआधी सलग तीन दिवस बाजारात घसरण झाली होती, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुमारे २.७% घट झाली होती. मात्र, सोमवारी बाजाराने जोरदार पुनरागमन करत सकारात्मक संकेत दिले.
तेजीमागील प्रमुख शेअर्स
- Sun Pharmaceutical Industries — +७.०३%
- Reliance Industries — +२.८८%
- Adani Ports and Special Economic Zone — +२.७२%
- Tech Mahindra — +२.६४%
- Mahindra & Mahindra — +२.१३%
- NTPC Limited — +२.१२%
- HCL Technologies — +२.१२%
- Tata Consultancy Services — +२.०९%
- Tata Steel — +१.६७%
- Kotak Mahindra Bank — +१.५४%
- Power Grid Corporation of India — +१.४५%
- Maruti Suzuki — +१.३७%
- Infosys — +१.३४%
गुंतवणूकदारांची बंपर कमाई
आजच्या वाढीमुळे बीएसई मार्केट कॅप ₹४,६८,०१,८४६.१७ कोटींवर पोहोचले, जे शुक्रवार रोजी ₹४,६१,४९,७५८.१८ कोटी होते. आजच्या दिवसात यात ₹६,५२,०८७.९९ कोटींची वाढ झाली. म्हणजेच, एका दिवसात गुंतवणूकदारांनी ₹६.५ लाख कोटींपेक्षा जास्तीची कमाई केली. फार्मा आणि आयटी क्षेत्रातील तेजीमुळे बाजाराला मजबूत आधार मिळाला.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
