lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; माझगाव डॉकच्या शेअरमध्ये तेजी, पतंजली आपटला

सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; माझगाव डॉकच्या शेअरमध्ये तेजी, पतंजली आपटला

बुधवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स 48 अंकांनी वाढून 73,143 च्या पातळीवर होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 09:53 AM2024-02-28T09:53:04+5:302024-02-28T09:53:23+5:30

बुधवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स 48 अंकांनी वाढून 73,143 च्या पातळीवर होता.

Sensex Nifty opens on a bullish note Mazgaon Dock shares rise Patanjali hit stock market | सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; माझगाव डॉकच्या शेअरमध्ये तेजी, पतंजली आपटला

सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; माझगाव डॉकच्या शेअरमध्ये तेजी, पतंजली आपटला

Stock Market Open Today: बुधवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स 48 अंकांनी वाढून 73,143 च्या पातळीवर होता, तर निफ्टी 16 अंकांनी वाढून 22,214 च्या पातळीवर ट्रेड करत होता. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक निर्देशांकात किंचित वाढ नोंदवली गेली. निफ्टी फार्मा निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात घसरणीसह उघडला. 
 

कामकाजादरम्यान भारती एअरटेल, टाटा मोटर्स, टाटा कंझ्युमर, हिंदाल्को, हीरो मोटोकॉर्प, एचयूएल आणि एसबीआय या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर अपोलो हॉस्पिटल, पॉवर ग्रिड, विप्रो, बीपीसीएल, ग्रासिम इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट आणि सिप्ला या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
 

बुधवारी शेअर बाजाराच्या व्यवहारादरम्यान, गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी पाच लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली होती. तर पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली तर अदानी पॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली.
 

पेटीएम आणि उर्जा ग्लोबलचे शेअर्स बुधवारी घसरणीसह ट्रेड करत होते. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या तासात माझगॉन डॉकच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांची तेजी दिसून आली तर पतंजलीचे शेअर्स तीन टक्क्यांनी घसरले होते.

Web Title: Sensex Nifty opens on a bullish note Mazgaon Dock shares rise Patanjali hit stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.