lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > SBI चा शेअर 800 रुपयांवर जाणार, जाणकारांनी दिला खरेदीचा सल्ला; तुमच्याकडे आहे का..?

SBI चा शेअर 800 रुपयांवर जाणार, जाणकारांनी दिला खरेदीचा सल्ला; तुमच्याकडे आहे का..?

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेच्या शेअर्सबाबत जाणकारांनी मोठा दावा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 02:39 PM2023-12-19T14:39:47+5:302023-12-19T14:40:18+5:30

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेच्या शेअर्सबाबत जाणकारांनी मोठा दावा केला आहे.

SBI Share Price: SBI share will go to Rs 800, experts advise to buy; do you have..? | SBI चा शेअर 800 रुपयांवर जाणार, जाणकारांनी दिला खरेदीचा सल्ला; तुमच्याकडे आहे का..?

SBI चा शेअर 800 रुपयांवर जाणार, जाणकारांनी दिला खरेदीचा सल्ला; तुमच्याकडे आहे का..?

SBI Share Price: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शेअर्सबाबत ब्रोकरेज हाऊसचे मोठे लक्ष्य समोर आले आहे. सध्या SBIच्या शेअरची किंमत 657.50 रुपये आहे. परंतु मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस (MOFSL) ने या सरकारी बँकेसाठी आपले लक्ष्य 800 रुपये ठेवले आहे. पूर्वी ब्रोकरेजने 700 रुपयांचे लक्ष्य ठेवले होते. ब्रोकरेजने एसबीआयच्या सध्याच्या किमतीपेक्षा 23 टक्के जास्तीचे लक्ष्य दिले आहे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या तज्ञांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सचे लक्ष्य वाढवताना सांगितले की, कमाईतील वाढ, कर्ज, मार्जिन स्थिरता आणि नियंत्रित क्रेडिट खर्चामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सच्या किमती सुधारल्या आहेत. ब्रोकरेज फर्मने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना Buy रेटिंग दिले आहे.

SBI च्या शेअर्समध्ये वाढ होण्याची अपेक्षा
बँक ऑफ बडोदाच्या शेअर लक्ष्य 240 रुपयांवरून 280 रुपये प्रति शेअर केले आहे, जे सध्या 223 रुपयांवर व्यवहार करत आहे, म्हणजेच 25 टक्के वाढ अपेक्षित आहे. इंडियन बँकेचे लक्ष्य 460 रुपयांवरून 525 रुपये प्रति शेअर करण्यात आले आहे, जे सध्याच्या किमतीपेक्षा सुमारे 18.5 टक्के अधिक आहे.

युनियन बँकेच्या शेअरचे लक्ष्य रु. 130 वरून 150 रु. करण्यात आले आहे, कॅनरा बँकेच्या शेअरचे लक्ष्य 440 वरून 550 रुपये करण्यात आले आहे, तर पंजाब नॅशनल बँकेचे लक्ष्य 130 रुपयांवरून वाढवले आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने 11 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या नोटमध्ये एसबीआयचे लक्ष्य 700 रुपये दिली होते, जे आता 800 रुपये करण्यात आले आहे.

SBI च्या व्यवसायात सुधारणा
एसबीआयचा 52 आठवड्यांचा नीचांक 499.35 रुपये आहे, तर 52 आठवड्यांचा उच्चांक 659 रुपये आहे. गेल्या एका वर्षात या सरकारी बँकेच्या शेअर्सने सुमारे 8 टक्के परतावा दिला आहे, तर 5 वर्षांत 125 टक्के परतावा दिला आहे. म्हणजे 5 वर्षात बँकेच्या शेअर्सने पैसे दुप्पट केले आहेत. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) SBI चा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 8% ने वाढून 14,330 कोटी रुपये झाला आहे. 

(टीप- आम्ही शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देत आहोत, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: SBI Share Price: SBI share will go to Rs 800, experts advise to buy; do you have..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.