Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > अल्पावधीत ₹१ लाखाचे ₹९८ लाख झाले; २८००% परतावा देणाऱ्या 'या' स्टॉकने सर्वांनाच चकीत केले...

अल्पावधीत ₹१ लाखाचे ₹९८ लाख झाले; २८००% परतावा देणाऱ्या 'या' स्टॉकने सर्वांनाच चकीत केले...

शेअर बाजारात अनेकदा लहान किमतीचे (पेनी) शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:30 IST2026-04-28T14:28:56+5:302026-04-28T14:30:42+5:30

शेअर बाजारात अनेकदा लहान किमतीचे (पेनी) शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देतात.

₹1 lakh became ₹98 lakh in a short period; 'This' stock, which gave 2800% returns, surprised everyone | अल्पावधीत ₹१ लाखाचे ₹९८ लाख झाले; २८००% परतावा देणाऱ्या 'या' स्टॉकने सर्वांनाच चकीत केले...

अल्पावधीत ₹१ लाखाचे ₹९८ लाख झाले; २८००% परतावा देणाऱ्या 'या' स्टॉकने सर्वांनाच चकीत केले...

Share Market : शेअर बाजारात अनेकदा लहान किमतीचे (पेनी) शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देतात. अशाच शेअर्समध्ये Websol Energy System Limited या कंपनीचाही समावेश झाला आहे. या पेनी स्टॉकने गेल्या काही वर्षांत जबरदस्त वाढ नोंदवत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. एप्रिल २०२० मध्ये हा शेअर केवळ ₹१.२५ वर ट्रेड करत होता. मात्र, सध्या याची किंमत सुमारे ₹१२२ पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच, अवघ्या ६ वर्षांत या शेअरने प्रचंड वाढ नोंदवली आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने ६ वर्षांपूर्वी या शेअरमध्ये ₹१ लाख गुंतवले असते आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज त्याची किंमत जवळपास ₹९८ लाखांपर्यंत पोहोचली असती. तसेच, ३ वर्षांपूर्वी केलेली ₹१ लाखांची गुंतवणूक आज सुमारे ₹१४ लाख झाली आहे. 

मागील काही दिवसातं दमदार कामगिरी 

या शेअरने शॉर्ट टर्ममध्येही मजबूत कामगिरी दाखवली आहे. मागील एका आठवड्यात हा शेअर सुमारे ३८% वाढला, तर मागील एका महिन्यात यात जवळपास ७२% वाढ झाली आहे. आज, २८ एप्रिल २०२६ रोजी या शेअरने ४.९९% वाढीसह ₹१२२.२० चा स्तर गाठला, जे बाजारातील मजबूत मागणीचे संकेत देते.

मजबूत आर्थिक निकालांचा प्रभाव

कंपनीच्या आर्थिक कामगिरीमुळेही या तेजीला चालना मिळाली आहे. FY२६ च्या चौथ्या तिमाहीत नफा १५७% वाढून ₹१२५ कोटी झाला, तर महसूल १३२% वाढून ₹४०१ कोटींवर पोहोचला. तसेच, संपूर्ण FY२६ मध्ये कंपनीचा नफा ₹३०३ कोटी झाला, जो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ९६% अधिक आहे. कंपनी उत्पादन क्षमता वाढवणे आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे यावरही भर देत आहे, ज्यामुळे भविष्यातील वाढीची शक्यता अधिक बळकट होत आहे.

रिन्यूएबल एनर्जी सेक्टरचा आधार

सोलर आणि रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील वाढती मागणीही या शेअरच्या वाढीमागील महत्त्वाचा घटक आहे. हरित उर्जेकडे वाढणारा कल या क्षेत्रातील कंपन्यांसाठी सकारात्मक संकेत देतो. तज्ज्ञांच्या मते, पेनी स्टॉक्समध्ये जितका मोठा परतावा मिळू शकतो, तितकीच जोखीमही असते. त्यामुळे अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल संशोधन आणि आर्थिक सल्ला घेणे आवश्यक आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : वेबसोल एनर्जी स्टॉक ने चौंकाया, 2800% रिटर्न, ₹1 लाख को ₹98 लाख में बदला।

Web Summary : वेबसोल एनर्जी के स्टॉक ने शानदार 2800% रिटर्न दिया। 2020 में ₹1 लाख का निवेश अब ₹98 लाख होगा। मजबूत वित्तीय नतीजे और नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र के विकास ने इस प्रभावशाली प्रदर्शन को बढ़ावा दिया। विशेषज्ञ पेनी स्टॉक से जुड़े जोखिमों के कारण सावधानी बरतने की सलाह देते हैं।

Web Title : Websol Energy stock stuns with 2800% return, turns ₹1 lakh into ₹98 lakh.

Web Summary : Websol Energy's stock soared, delivering a staggering 2800% return. A ₹1 lakh investment in 2020 would now be ₹98 lakh. Strong financial results and renewable energy sector growth fueled this impressive performance. Experts advise caution due to risks associated with penny stocks.