lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > संरक्षण मंत्रालयानं दिलं ₹५५२ कोटींचं कंत्राट, शेअर खरेदीसाठी लोकांच्या उड्या; लागलं अपर सर्किट

संरक्षण मंत्रालयानं दिलं ₹५५२ कोटींचं कंत्राट, शेअर खरेदीसाठी लोकांच्या उड्या; लागलं अपर सर्किट

शेअर बाजारातील एका लिस्टेड कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडू मोठं कंत्राट मिळालं आहे. यानंतर या कंपनीच्या शेअरनं तुफान स्पीड पकडलाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 04:58 PM2023-07-11T16:58:01+5:302023-07-11T16:58:46+5:30

शेअर बाजारातील एका लिस्टेड कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडू मोठं कंत्राट मिळालं आहे. यानंतर या कंपनीच्या शेअरनं तुफान स्पीड पकडलाय.

Ministry of Defense gave 552 crore rs contract investors buy shares Next Upper Circuit 20 percent bse nse | संरक्षण मंत्रालयानं दिलं ₹५५२ कोटींचं कंत्राट, शेअर खरेदीसाठी लोकांच्या उड्या; लागलं अपर सर्किट

संरक्षण मंत्रालयानं दिलं ₹५५२ कोटींचं कंत्राट, शेअर खरेदीसाठी लोकांच्या उड्या; लागलं अपर सर्किट

शेअर बाजारातील एका लिस्टेड कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडू मोठं कंत्राट मिळालं. यानंतर या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. दरम्यान, गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केल्यानंतर या शेअरला अपर सर्किट लागलं. प्रीमियर एक्सप्लोसिव्हज असं या कंपनीचं नाव आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअर्सना 20 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं.

कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक आलेल्या या तेजीचं कारण म्हणजे 552.26 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर. संरक्षण मंत्रालयानं कंपनीला ही वर्क ऑर्डर दिली आहे. बीएसईवरील 20 टक्क्यांच्या अपर सर्किटनंतर प्रीमियर एक्सप्लोसिव्हच्या शेअरची किंमत 588.75 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. 

काय म्हटलंय कंपनीनं?
भारतीय हवाई दलाकडून ही नवीन वर्क ऑर्डर मिळाली आहे. या वर्क ऑर्डर अंतर्गत कंपनीला चाफ्स आणि फ्लेअर्सचा पुरवठा करायचा करायचा असल्याची माहिती कंपनीनं शेअर बाजाराला दिली. रडारला कनफ्युज करण्यासाठी चाफ आणि फ्लेअर्सचा वापर केला जातो. कंपनीला ही ऑर्डर 12 महिन्यांच्या आत पूर्ण करायची आहे.

या ऑर्डरपूर्वी कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून गेल्या आठवड्यात 76.78 कोटी रुपयांचं काम मिळालं होते. या दोघांशिवाय कंपनीला बूस्टर ग्रेन्स पुरवठ्यासाठी 9.73 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.

Web Title: Ministry of Defense gave 552 crore rs contract investors buy shares Next Upper Circuit 20 percent bse nse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.