lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > एक मोठी ऑर्डर आणि गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या; 'या' एनर्जी कंपनीच्या शेअरला अपर सर्किट

एक मोठी ऑर्डर आणि गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या; 'या' एनर्जी कंपनीच्या शेअरला अपर सर्किट

गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली. सध्या हा शेअर बीएसईवर 40.45 रुपयांवर व्यवहार करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 03:30 PM2024-03-07T15:30:25+5:302024-03-07T15:31:39+5:30

गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली. सध्या हा शेअर बीएसईवर 40.45 रुपयांवर व्यवहार करत आहे.

A large order and investors jump on the stock Upper circuit Suzlon Energy Share details | एक मोठी ऑर्डर आणि गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या; 'या' एनर्जी कंपनीच्या शेअरला अपर सर्किट

एक मोठी ऑर्डर आणि गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या; 'या' एनर्जी कंपनीच्या शेअरला अपर सर्किट

Suzlon Energy Share Price : गुरुवारी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली. सध्या हा शेअर बीएसईवर 40.45 रुपयांवर व्यवहार करत आहे. रिन्यूएबल एनर्जी सोल्यूशन्स पुरवणाऱ्या कंपनीला ज्युनिपर ग्रीन एनर्जीकडून (Juniper Green Energy) विंड पॉवर प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली आहे. या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप 55 हजार कोटींच्या पुढे गेलं आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 50.72 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 6.96 रुपये आहे.
 

विंड पॉवर प्रोजेक्टची मिळाली ऑर्डर
 

सुझलॉनला जुनिपर ग्रीन एनर्जीसाठी 72.45 मेगावॅटचा विंड पॉवर प्रोजेक्ट विकसित करण्याची ऑर्डर मिळाली आहे. कंपनी गुजरातमधील द्वारका येथील क्लायंटच्या साईटवर प्रत्येकी 3.15 मेगावॅट क्षमतेचे हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर (HLT) टॉवर आणि 23 विंड टर्बाइन जनरेटर (WTG) बसवणार आहे.
 

करारानुसार, सुझलॉन विंड टर्बाइन (उपकरणांचा पुरवठा) करेल. सुझलॉन कमिशनिंगनंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑपरेशन आणि देखभाल सेवा सुरू करेल.
 

या निर्णयानंतर झालेली घसरण 
 

यापूर्वी कंपनीच्या शेअर्सला सातत्यानं 5 टक्क्यांचं लोअर सर्किट लागत होतं. बुधवारी कंपनीचे शेअर्सनं इंट्राडे नीचांकी 38.53 रुपयांवर पोहोचले होते. यासह, सुझलॉन एनर्जीचा स्टॉक 2 फेब्रुवारी रोजी 50.72 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावरून 25 टक्क्यांनी खाली आला. 5 दिवसांत स्टॉक 15 टक्क्यांनी घसरला होता. शेअर्सच्या या घसरणीमागे मोठं कारण होतं. विंड एनर्जी कॅपॅसिटीसाठी सरकार पुन्हा "रिव्हर्स ऑक्शन" आणण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आल्यानंतर यात घसरण दिसून आली होती.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही.  कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: A large order and investors jump on the stock Upper circuit Suzlon Energy Share details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.