lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजाराला उधाण, तरीही ६० टक्के कंपन्यांनी दिला तोटा! अनेक कंपन्यांचा लॉक इन पीरियड या महिन्यात संपणार

शेअर बाजाराला उधाण, तरीही ६० टक्के कंपन्यांनी दिला तोटा! अनेक कंपन्यांचा लॉक इन पीरियड या महिन्यात संपणार

भारतीय शेअर बाजाराने या वर्षी जगभरातील शेअर बाजारांच्या तुलनेत उत्तम रिटर्न दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 08:01 AM2022-11-10T08:01:52+5:302022-11-10T08:02:23+5:30

भारतीय शेअर बाजाराने या वर्षी जगभरातील शेअर बाजारांच्या तुलनेत उत्तम रिटर्न दिले आहेत.

A boost to the stock market still 60 percent of the companies gave a loss The lock in period of many companies will end this month | शेअर बाजाराला उधाण, तरीही ६० टक्के कंपन्यांनी दिला तोटा! अनेक कंपन्यांचा लॉक इन पीरियड या महिन्यात संपणार

शेअर बाजाराला उधाण, तरीही ६० टक्के कंपन्यांनी दिला तोटा! अनेक कंपन्यांचा लॉक इन पीरियड या महिन्यात संपणार

मुंबई :

भारतीय शेअर बाजाराने या वर्षी जगभरातील शेअर बाजारांच्या तुलनेत उत्तम रिटर्न दिले आहेत. महागाईच्या कारणामुळे झालेली व्याजदरवाढ, रशिया- युक्रेन संकटांमुळे आलेल्या मोठ्या अस्थिरतेनंतरही भारतीय बाजार उच्चांकी आकड्यांपासून अगदी काही पावले दूर आहे. 

बाजार एकीकडे उच्चांकी स्तरावर असताना ६० टक्क्यांपेक्षा अधिक कंपन्यांनी नकारात्मक परतावा दिला आहे. केवळ २१ टक्के कंपन्यांनी ऑक्टोबर २०२१ पासून आतापर्यंत २० % पेक्षा अधिक परतावा दिला आहे. तर २०२२ मध्ये आयपीओ आणणाऱ्या १० कंपन्यांचा लॉक इन पीरियड संपत असून गुंतवणूकदार शेअर विकू शकतात.

यामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. यातील ६० टक्के कंपन्यांचे शेअर्स अगोदरच इश्यू प्राइजच्या खाली ट्रेड करत आहेत. बाजाराचा निर्देशांक ऑक्टोबर २०२१ मध्ये ६१,४७५ या उच्चांकी स्तरावर पोहोचला होता, तो आता ॲक्टोबरमध्ये पुन्हा ६१,१८६ अंकावर पोहोचला होता.

बाजार घसरेल का? 

  • नोव्हेंबर महिन्यात १४ अब्ज डॉलरच्या किमतीच्या न्यूएज शेअर्सचा लॉक इन पीरियड संपत आहे. यामुळे शेअर्समध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. 
  •  झोमॅटोचा लॉक इन पीरियड संपल्यानंतर कंपनीचे शेअर्स २१ टक्क्यांनी कोसळले होते, त्यामुळे ही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
  • ६१,४७५ हा उच्चांकी गाठण्यापासून बाजाराचा निर्देशांक केवळ ४४२ अंक खाली
  • १८,२०३ चा स्तर गाठण्यासाठी निफ्टीला केवळ काही अंश वाढीची गरज. यामुळे बाजारात गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न मिळाले आहेत. 
  • १,४०० कोटी डॉलरचे शेअर्स नोव्हेंबरमध्ये लॉक इनपासून मुक्त होणार
  • १५ कंपन्यांचा लॉक इन डिसेंबरपर्यंत संपणार




     

Web Title: A boost to the stock market still 60 percent of the companies gave a loss The lock in period of many companies will end this month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.