lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > ६३,०९९ सेन्सेक्सचा ऐतिहासिक टप्पा; ७ सत्रांत २ हजारांनी झेप

६३,०९९ सेन्सेक्सचा ऐतिहासिक टप्पा; ७ सत्रांत २ हजारांनी झेप

परकीय गुंतवणूकदारांची खरेदी सुरूच; ७ सत्रांत २ हजारांनी झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 06:23 AM2022-12-01T06:23:21+5:302022-12-01T06:23:46+5:30

परकीय गुंतवणूकदारांची खरेदी सुरूच; ७ सत्रांत २ हजारांनी झेप

63,099 Sensex historical level; A jump of 2 thousand in 7 sessions | ६३,०९९ सेन्सेक्सचा ऐतिहासिक टप्पा; ७ सत्रांत २ हजारांनी झेप

६३,०९९ सेन्सेक्सचा ऐतिहासिक टप्पा; ७ सत्रांत २ हजारांनी झेप

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय शेअर बाजाराने सलग सातव्या दिवशी तेजी कायम राखत पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांकी मजल मारली. मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक सेन्सेक्स प्रथमच ६३ हजारांवर पाेहाेचला. सेन्सेक्स ४१७.८१ अंकांनी वधारून ६३,०९९.६५ वर बंद झाला. तर निफ्टीही १४०.३० अंकांनी वधारून १८,७५८.३५ वर बंद झाला. 

बुधवारी शेअर बाजार उघडल्यानंतर दुपारपर्यंत फार तेजी नव्हती. परंतु, दुपारी दाेननंतरच्या सत्रात बाजारात माेठी तेजी आली. सेन्सेक्सने ६३,३०३ ही इंट्रा डे उच्चांकी पातळी गाठली. तर निफ्टीनेही इंट्रा डेदरम्यान प्रथमच १८,८०० ही पातळी गाठली आणि १८,८१६ अंकांचा उच्चांक गाठला हाेता. आता शेअर बाजाराच्या नजरा अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेराेम पाॅवेल यांच्या घाेषणेकडे लागल्या आहेत. व्याजदरवाढीबाबत त्यांनी नरमाईची भूमिका घेतल्यास बाजारात आणखी तेजी दिसू शकते.

५२ हजारांच्या खाली गेला हाेता सेन्सेक्स
n १४ महिन्यांच्या कालावधीत सेन्सेक्सने ६० हजारांवरून ६३ हजारांपर्यंतचा टप्पा गाठला आहे. 
n यावर्षी सुरुवातीला युक्रेन युद्धाच्या प्रभावामुळे सेन्सेक्समध्ये घसरण झाली हाेती. 
n जून महिन्यात जवळपास ५१,३६० या पातळीपर्यंत सेन्सेक्स घसरला हाेता. त्यानंतर त्यात सातत्याने तेजी दिसत आहे.
या क्षेत्रांमध्ये तेजी
n शेअर बाजारात बुधवारी 
ऑटाे, एफएमसीजी, मेटल्स आणि बांधकाम क्षेत्रात मजबुती दिसली. 
n या क्षेत्रांमध्ये १.५ टक्क्यांहून अधिक तेजी हाेती. सेन्सेक्सच्या ३० पैकी २६ कंपन्यांचे शेअर्स वधारले. 

तेजी कशामुळे?
n भारतीय शेअर बाजारात परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी माेठ्या प्रमाणात खरेदी केली. बुधवारी शेवटच्या सत्रात त्यामुळेच शेअर बाजाराने उत्तुंग झेप घेतली. 
n याशिवाय युराेपियन बाजारातही तेजी दिसून आली. तसेच दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी अपेक्षेनुसार असण्याच्या अंदाजामुळे गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित झाले आहेत. 

परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी १,२४१ काेटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले हाेते. बुधवारी हा आकडा यापेक्षा जास्त हाेता. सलग सातव्या दिवशी तेजी आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये नफेखाेरी दिसू शकते. निफ्टी १८,६५०पर्यंतची पातळी कायम राखू शकताे. 

रुपयाही वधारला
रुपयामध्येही तेजी दिसून आली. परकीय चलन बाजारात रुपया ३४ पैशांनी वधारून डाॅलरच्या तुलनेत ८१.३८ रुपये प्रति डाॅलरवर बंद झाला. 

१९८६          १००
जुलै १९९०      १०००
ऑक्टाे. १९९९         ५०००
फेब्रु. २००६     १००००
डिसेंबर ०७      २००००
एप्रिल २०१७      ३००००
जून २०१९      ४००००
फेब्रु.२०२१      ५००००
सप्टेंबर २०२१      ६००००
३० नाेव्हें. २२      ६३,०९९ 

 

Web Title: 63,099 Sensex historical level; A jump of 2 thousand in 7 sessions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.