lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > 1 रुपयाच्या शेअरने दिले 5900% रिटर्न्स, एका झटक्यात गुंतवणूकदार झाले मालामाल...

1 रुपयाच्या शेअरने दिले 5900% रिटर्न्स, एका झटक्यात गुंतवणूकदार झाले मालामाल...

स्टॉक मार्केटमध्ये अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी गेल्या काही काळात गुंतवणूकदारांना तगडे रिटर्न्स दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 02:38 PM2022-12-12T14:38:59+5:302022-12-12T14:39:33+5:30

स्टॉक मार्केटमध्ये अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी गेल्या काही काळात गुंतवणूकदारांना तगडे रिटर्न्स दिले आहेत.

1 rupee share gave 5900% returns, investors became rich in 4 years | 1 रुपयाच्या शेअरने दिले 5900% रिटर्न्स, एका झटक्यात गुंतवणूकदार झाले मालामाल...

1 रुपयाच्या शेअरने दिले 5900% रिटर्न्स, एका झटक्यात गुंतवणूकदार झाले मालामाल...


स्टॉक मार्केटमध्ये अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी गेल्या काही काळात गुंतवणूकदारांना तगडे रिटर्न्स दिले आहेत. सन्मित इंफ्राचे शेअर्स त्यापैकी एक आहेत. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 4 वर्षात मोठी उडी मारली आहे. या चार वर्षात सन्मित इन्फ्राचा शेअर 1.31 रुपयांवरुन वाढून 78.75 रुपयांच्या पातळीवर आला आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअर्समध्ये 5900 टक्के वाढ दिसून आली आहे.

या पेनी स्टॉकची प्राइस हिस्ट्री पाहा
गेल्या एका महिन्याच्या कामगिरीवर नजर टाकली तर, एका महिन्यातच या शेअरने 8 टक्के वाढ नोंदवली आहे. तर, 6 महिन्यांपूर्वी सन्मित इंफ्राचे शेअर 42 रुपयांवर होते. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत 78.75 रुपयांवर आली आहे. म्हणजेच गेल्या 6 महीन्यात कंपनीने 90 टक्के रिटर्न्स दिले आहेत. तसेच, गेल्या वर्षभरात 160 टक्के परतावा पाहायला मिळाला आहे.

गुंतवणूकदार मालामाल
सन्मित इंफ्रा एक स्मॉल कॅप कंपनी आहे. जर एखाद्या व्यक्तीने एका वर्षापूर्वी कंपनीत गुंतवणूक केली असती तर त्याचा रिटर्न वाढून 1.08 लाख रुपये झाला असता. तर, 6 महीन्यांपूर्वी गुंतवणूक करणाऱ्याला 1.90 लाख रुपये मिळाले असते. अशाचप्रकारे 4 वर्षांपूर्वी सन्मित इंफ्राचे शेअर 1.31 रुपयांवर होते. तेव्हा एखाद्या व्यक्तीने एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 60 लाख रुपये मिळाले असते.
 

Web Title: 1 rupee share gave 5900% returns, investors became rich in 4 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.