lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिवाळीपूर्वी स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या, सविस्तर...

दिवाळीपूर्वी स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या, सविस्तर...

sovereign gold bond : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सॉव्हरेन गोल्ड बाँड (sovereign gold bond) स्कीमची आठवी सीरीज आणली आहे.

By ravalnath.patil | Published: November 9, 2020 09:48 AM2020-11-09T09:48:18+5:302020-11-09T09:49:03+5:30

sovereign gold bond : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सॉव्हरेन गोल्ड बाँड (sovereign gold bond) स्कीमची आठवी सीरीज आणली आहे.

sovereign gold bond today you can buy cheap gold from 9 to 13 november 2020 | दिवाळीपूर्वी स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या, सविस्तर...

दिवाळीपूर्वी स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या, सविस्तर...

Highlightsसॉव्हरेन गोल्ड बाँडची इश्यू किंमत प्रति ग्रॅम ५१७७ रुपये आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने ऑनलाईन खरेदी केल्यास त्याला प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट दिली जाणार आहे.

नवी दिल्लीः यंदाच्या दिवाळीपूर्वी (Diwali 2020) केंद्र सरकार तुम्हाला स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. ९ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून तुम्ही सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सॉव्हरेन गोल्ड बाँड (sovereign gold bond) स्कीमची आठवी सीरीज आणली आहे. यावेळी आरबीआयने सोन्याची किंमत ५,१७७ रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. आपल्या माहितीसाठी, सॉव्हरेन गोल्ड बाँड आरबीआयद्वारे सरकारच्यावतीने जारी केले जाते.

९-१३ नोव्हेंबरपर्यंत संधी
तुम्हाला 9 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान खरेदी करण्याची संधी आहे. याशिवाय, याची सेटलमेंटची तारीख १८ नोव्हेंबर आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँडची इश्यू किंमत प्रति ग्रॅम ५१७७ रुपये आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने ऑनलाईन खरेदी केल्यास त्याला प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट दिली जाणार आहे. डिजिटल खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ५१२७ रुपये असेल. गुंतवणूकदार किमान १ ग्रॅम सोन्यात सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करु शकतात. स्वतंत्रपणे ४ किलो सोन्याची गुंतवणूक केली जाऊ शकते. याचा मॅच्युरिटी कालावधी ८ वर्षे आहे. गुंतवणूतीच्या पाचव्या वर्षांपासून या स्कीममधून बाहेर पडायला पर्याय आहे.

कशी करावी गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक?
या गोल्ड बाँडची गुंतवणूक बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्सचेंज (बीएसई, एनएसई) मार्फत केली जाऊ शकते. छोट्या फायनान्स बँका आणि पेमेंट बँकांमार्फत यामध्ये गुंतवणूक करण्याचा कोणताही पर्याय नाही आहे.

वर्षाला २.५ टक्के व्याज 
सॉव्हरेन गोल्ड बाँडवर वर्षाला २,५० टक्के व्याज मिळते. सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूकीची सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्याला त्याच्या स्टोरेजबद्दल काळजी करण्याची गरज नाही. याला डीमॅटमध्ये ठेवण्यावर कोणताही जीएसटी सुद्धा द्यावा लागत नाही. जर सॉव्हरेन  गोल्ड बाँडच्या मॅच्युरिटीवर काही कॅपिटल गेन्स (भांडवली नफा) झाला तर यावर सूट दिली जाईल. सॉव्हरेन गोल्ड बाँडवरील हा एक विशेष फायदा आहे.

कधी लाँच झाली होती स्कीम?
केंद्र सरकारने २०१५ मध्ये सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम लाँच केली होती, कारण फिजिकल गोल्डची मागणी कमी व्हावी. रिझर्व्ह बॅंकेच्या वार्षिक अहवाल २०१९-२० नुसार, सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या ३७ भागांतून एकूण ९, ६५२.७८ कोटी रुपयांचे ३०.९८ टन सोने जारी करण्यात आले आहे.

सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम ही आरबीआयच्यावतीने जारी केली जाते 
केंद्र सरकारच्यावतीने आरबीआयद्वारे सॉव्हरेन गोल्ड बाँडची स्कीम जारी करण्यात येते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) प्रकाशित केलेल्या सरासरी बंद किंमतीच्या आधारे आरबीआयने गोल्ड बाँडच्या खाली सोन्याची किंमत निश्चित केली आहे. ही स्कीम 999 शुद्ध सोन्यासाठी आहे.

Web Title: sovereign gold bond today you can buy cheap gold from 9 to 13 november 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.