lokmat Supervote 2024
Lokmat Money >गुंतवणूक > Tata Group ब्रिटेनमध्ये उभारणार सर्वात मोठी EV फॅक्टरी; ₹41,460 कोटींची गुंतवणूक करणार

Tata Group ब्रिटेनमध्ये उभारणार सर्वात मोठी EV फॅक्टरी; ₹41,460 कोटींची गुंतवणूक करणार

Tata Group's Agratas Install EV Factory in Britain: या फॅक्टरीतून दरवर्षी 50 लाखांहून अधिक वाहने तयार होतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 06:52 PM2024-02-28T18:52:44+5:302024-02-28T18:53:18+5:30

Tata Group's Agratas Install EV Factory in Britain: या फॅक्टरीतून दरवर्षी 50 लाखांहून अधिक वाहने तयार होतील.

Tata Group's Agratas Install EV Factory in Britain: Tata Group to set up largest EV factory in Britain; Will invest ₹41,460 crore | Tata Group ब्रिटेनमध्ये उभारणार सर्वात मोठी EV फॅक्टरी; ₹41,460 कोटींची गुंतवणूक करणार

Tata Group ब्रिटेनमध्ये उभारणार सर्वात मोठी EV फॅक्टरी; ₹41,460 कोटींची गुंतवणूक करणार

Tata Group's Agratas Install EV Factory in Britain: देशातील आघाडीचा TATA समूह भारतासह ब्रिटनमध्येही आपला व्यवसाय वाढवत आहे. टाटा समूहाची उपकंपनी Agratas ब्रिटनमध्ये सर्वात मोठा इलेक्ट्रिक वाहन कारखाना उभारणार आहे. हा EV प्लांट ब्रिटनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्लांट असेल. तसेच, भारताबाहेर ब्रिजवॉटरमधील ही पहिली गिगाफॅक्टरी असेल. यासाठी कंपनी 41000 कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक करणार आहे.

40 GWH क्षमतेचा कारखाना
या गिगाफॅक्टरीसाठी कंपनी 41460 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक डेट आणि इक्विटीच्या माध्यमातून केली जाईल आणि या निधीचा वापर प्लांट बांधण्यासाठी होईल. विशेष म्हणजे, या प्लांटची क्षमता 40 GW असेल.

2026 पासून व्यावसायिक उत्पादन सुरू 
गेल्या वर्षी जुलै महिन्यात टाटा समूहाने ब्रिटनमध्ये EV प्लांट उभारण्याची योजना आखली होती. पुढील 2 वर्षांत म्हणजे 2026 पर्यंत या प्लांटमधून व्यावसायिक उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. या प्लांटमुळे ब्रिटनच्या EV क्षेत्राला पुश मिळेल आणि लोकही इलेक्ट्रिक वाहनांचा अधिकाधिक वापर करतील.

दरवर्षी 50 लाख वाहने बनवली जातील
प्लांटचे पहिले ग्राहक टाटा मोटर्स आणि जेएलआर असतील. या दोन्ही कंपन्या टाटा समूहाच्या अंतर्गत आहेत. बॅटरीच्या आकारमानानुसार या प्लांटमधून दरवर्षी 50 लाख वाहनांचा पुरवठा केला जाईल, असा अंदाज आहे. दरम्यान, Agratas ही Tata Group ची जागतिक बॅटरी व्यवसाय कंपनी आहे. या प्लांटमुळे त्या भागात 4000 ग्रीन टेक नोकऱ्याही निर्माण होतील.

Web Title: Tata Group's Agratas Install EV Factory in Britain: Tata Group to set up largest EV factory in Britain; Will invest ₹41,460 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.