lokmat Supervote 2024
Lokmat Money >गुंतवणूक > आजोबा हातगाडीवर विकायचे साड्या; नातवाने गावातच उभारली 50 कोटींची कंपनी...

आजोबा हातगाडीवर विकायचे साड्या; नातवाने गावातच उभारली 50 कोटींची कंपनी...

शार्क टँक इंडियात आला अन् तीन शार्क्ससोबत केली मोठी डील...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 08:37 PM2024-03-12T20:37:19+5:302024-03-12T20:37:41+5:30

शार्क टँक इंडियात आला अन् तीन शार्क्ससोबत केली मोठी डील...

Shark Tank India: Grandpa sells sarees on handcart; 50 crores company set up by the grandson in the village.. | आजोबा हातगाडीवर विकायचे साड्या; नातवाने गावातच उभारली 50 कोटींची कंपनी...

आजोबा हातगाडीवर विकायचे साड्या; नातवाने गावातच उभारली 50 कोटींची कंपनी...

Shark Tank India Season 3: शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन (Shark Tank India Season 3) लोकांना खूप आवडतोय. या शो-मध्ये अनेकण आपल्या अनोख्या बिझनेस आयडिया घेऊन येतात आणि 'शार्क्स'कडून मोठा निधी मिळवून जातात. हिमाचल प्रदेशातील बंगणा, या छोट्याशा गावातून आलेल्या अंकुश बडजाता याची कहानी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंकुशने एका छोट्या शहरात 50 कोटी रुपयांची कंपनी उभारली. तसेच, तीन शार्क्ससोबत एक डीलही पक्की केली.

अंकुशने आपल्या आजोबांचा वारसा नवीन मार्गाने पुढे नेत ‘डीवा’ची सुरुवात केली. हा साड्यांचा ऑनलाइन व्यवसाय आहे, ज्यात उत्पादकांना थेट ग्राहकांशी जोडले जाते. अंकुशचे हातगाड्यावर साड्या विकायचे, तर वडील साडीच्या दुकानात काम करायचे. उत्पन्न कमी होते, त्यामुळे अंकुशने सरकारी शाळेत शिक्षण घेतले. पुढे चेन्नईतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने एका कंपनीत नोकरी सुरू केली. पण, 2014 मध्ये अंकुशने वडिलांना त्यांच्या कामात मदत करण्याचे ठरवले. अंकुशने साडीच्या वर्कला नवा लूक दिला आणि ऑनलाइन विक्री सुरू केली. 

अंकुशने हिमाचलमधील एका छोट्या गावातून फक्त 10 कर्मचाऱ्यांसह कंपनी सुरू केली आणि पाहता पाहता 7 कोटी रुपयांचा नफा कमावला. शार्क टँकचया तिसऱ्यी सीझनमध्ये आल्यानंतर अंकुशने शार्क्ससमोर आपली अप्रतिम पीच सादर केली. अंकुशच्या कंपनीची कामगिरी आणि त्याची प्रचंड मेहनत करण्याचा अप्रोच पाहून सर्व शार्क प्रभावित झाले. शार्क अमन गुप्ता (boAt चा सह-संस्थापक आणि CMO), रितेश अग्रवाल (OYO Rooms चा संस्थापक आणि CEO) आणि राधिका गुप्ता (Edelweiss Mutual Fund ची MD आणि CEO) यांनी अंकुशच्या कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. अंकुशने शार्क्सकडे 50 कोटी रुपयांच्या मुल्यांकनात 2 कोटी रुपयांच्या 4 टक्के इक्विटीची मागणी केली. बोलणीअखेर तीन शार्क्सने 75 लाख रुपयांमध्ये 6 टक्के इक्विटी आणि 1.25 कोटी रुपये कर्जासह तीन वर्षांसाठी करार केला. आता अंकुशला तीन शार्क्सचा आधार मिळाला आहे. 

Web Title: Shark Tank India: Grandpa sells sarees on handcart; 50 crores company set up by the grandson in the village..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.