Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > NPS Rules 2026: निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल? जाणून घ्या नवीन नियम...

NPS Rules 2026: निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल? जाणून घ्या नवीन नियम...

NPS Rules 2026: केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘NPS नियम २०२६’ लागू केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 18:07 IST2026-04-26T18:06:33+5:302026-04-26T18:07:24+5:30

NPS Rules 2026: केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘NPS नियम २०२६’ लागू केले आहेत.

NPS Rules 2026: How much pension will you get after retirement? Know the new rules | NPS Rules 2026: निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल? जाणून घ्या नवीन नियम...

NPS Rules 2026: निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल? जाणून घ्या नवीन नियम...

NPS Rules :केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘NPS नियम २०२६’ लागू केले असून, निवृत्ती नियोजनाबाबत असलेली संभ्रमस्थिती दूर झाली आहे. नवीन नियमांनुसार, कर्मचाऱ्यांच्या पगारातून (बेसिक + डीए) १०% रक्कम कपात होणार असून, सरकारकडून १४% योगदान दिले जाणार आहे. याशिवाय, प्रशासनिक विलंब झाल्यास सरकारकडून व्याज भरपाईची तरतूद करण्यात आली आहे.

कोणाला लागू होणार हे नियम?

हे नवीन नियम १ जानेवारी २००४ नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असतील. जुनी पेन्शन योजना (OPS) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर या नियमांचा परिणाम होणार नाही.

पगारातून किती कपात? सरकारचे योगदान किती?

National Pension System (NPS) अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतन + महागाई भत्ता (DA) याच्या १०% रक्कम दरमहा जमा होईल आणि सरकारकडून १४% योगदान दिले जाईल. सरकारचे जास्त योगदान दीर्घकालीन गुंतवणुकीत मोठा फायदा देणारे ठरणार आहे. कंपाउंडिंगमुळे निवृत्तीवेळी मोठा निधी तयार होण्यास मदत होईल.

विलंब झाल्यास व्याजाची भरपाई

पूर्वी अनेकदा प्रशासनिक कारणांमुळे NPS खातेात रक्कम जमा होण्यास उशीर होत होता. नवीन नियमांनुसार, विलंब झाल्यास त्या कालावधीचे पूर्ण व्याज सरकार देईल. कर्मचाऱ्यांना कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

PRAN आता तत्काळ मिळणार

पूर्वी Permanent Retirement Account Number (PRAN) मिळण्यासाठी मोठा विलंब होत होता. मात्र, आता नोकरी लागल्याबरोबर NPS खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू होईल, निश्चित कालावधीत PRAN जारी केला जाईल आणि पहिल्या महिन्यापासूनच गुंतवणूक सुरू होईल.

निवृत्तीनंतर किती मिळेल?

निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन  NPS खात्यात जमा झालेली एकूण रक्कम आणि त्या रकमेवर मिळालेला परतावा यावर अवलंबून असेल. नियमांनुसार, एक हिस्सा एकरकमी काढता येईल, मात्र उर्वरित रक्कम Annuity मध्ये गुंतवावी लागेल. ही अॅन्युटी आयुष्यभर नियमित मासिक पेन्शन देईल. दीर्घकालीन दृष्टीने हे बदल कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेला बळ देणारे ठरणार आहेत.

Web Title : एनपीएस 2026 नियम: सेवानिवृत्ति के बाद पेंशन लाभ जानें

Web Summary : नए एनपीएस 2026 नियम सरकारी कर्मचारियों को लाभान्वित करते हैं। 10% वेतन कटौती, 14% सरकारी योगदान। विलंबित जमा पर ब्याज। पीआरएएन तुरंत जारी किया गया। पेंशन संचित राशि और रिटर्न पर निर्भर करती है, मासिक भुगतान के लिए वार्षिकी विकल्प के साथ।

Web Title : NPS 2026 Rules: Know Pension Benefits After Retirement

Web Summary : New NPS 2026 rules benefit government employees. 10% salary deduction, 14% government contribution. Interest on delayed deposits. PRAN issued promptly. Pension depends on accumulated amount and returns, with annuity option for monthly payments.