lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Hike: पुन्हा खिसा कापला! घरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला

LPG Hike: पुन्हा खिसा कापला! घरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला

LPG Price Hike महिनाभरात १२५ रुपयांची दरवाढ; महागाई वाढीची शक्यता, सामान्यांचे बजेट कोलमडणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 06:56 AM2021-03-02T06:56:40+5:302021-03-02T06:57:14+5:30

LPG Price Hike महिनाभरात १२५ रुपयांची दरवाढ; महागाई वाढीची शक्यता, सामान्यांचे बजेट कोलमडणार 

Pocket cut again! LPG gas cylinder Price hike by Rs 25 | LPG Hike: पुन्हा खिसा कापला! घरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला

LPG Hike: पुन्हा खिसा कापला! घरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पेट्रोल व डिझेलबरोबरच घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरातही सतत वाढ होत असून, मार्चच्या पहिल्याच दिवशी सिलिंडर आणखी २५ रुपयांनी महागला. गेल्या महिन्यात तीनदा मिळून सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची वाढ करण्यात आली होती.


 गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. पण सोमवारी  सिलिंडरचे दर तब्बल २५ रुपयांनी वाढवण्यात आले. एकीकडे डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूक महागली आहे. परिणामी भाज्या, अन्नधान्ये 
महाग होत आहेत. त्याचा सामान्यांना फटका बसत आहे. त्यात पुन्हा सिलिंडर महागल्याने गरीब व सामान्यांचे बजेट कोलमडून पडण्याची शक्यता आहे. 
 याआधी ४ फेब्रुवारी रोजी २५ रुपये, १४ फेब्रुवारीला ५० रुपये आणि २५ फेब्रुवारीला २५ रुपये अशी  दरवाढ करण्यात आली होती. फेब्रुवारीत 
१०० रुपये व आज २५ रुपये असे 
१२५ रुपयांनी सिलिंडर महागले 
आहे. 


पुन्हा चुलीकडे
केंद्र सरकार सबसिडी सतत कमी करीत असून, त्यामुळेच गॅस सिलिंडर महाग होत आहेत. लोकांना ते घेणे परवडेनासे झाले 
आहेत आणि त्यांची मागणीही घटली आहे. अनेक जणांनी गॅस सिलिंडर घेणे बंद केले आहे. ग्रामीण भागांतील गरीब तर पुन्हा चुलीचा वापर करू लागले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय घेणार असल्याची माध्यमात चर्चा आहे. असा निर्णय होण्याआधीच मोर्चा काढून श्रेय लाटण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सायकल रॅली काढल्याची शंका आहे. 
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते 

    ही असेल किंमत 
n सोमवारी करण्यात आलेल्या  दरवाढीमुळे मुंबई व दिल्लीत 
गॅस सिलिंडरसाठी ८१९ रुपये मोजावे लागणार आहेत. 
n कोलकात्यात सिलिंडरची किंमत ८४५, चेन्नईमध्ये ८३५, तर हैदराबादमध्ये ८७१. ५० रुपये इतकी असेल. 

Web Title: Pocket cut again! LPG gas cylinder Price hike by Rs 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.