lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजारभावापेक्षा स्वस्त घर खरेदी करण्याची संधी; १५ जूनपासून PNB विकतेय १२८६५ घरं अन् शेतजमिनी

बाजारभावापेक्षा स्वस्त घर खरेदी करण्याची संधी; १५ जूनपासून PNB विकतेय १२८६५ घरं अन् शेतजमिनी

१५ जून पासून हा लिलाव सुरू करण्यात येणार आहे. या मालमत्तेत निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषी मालमत्ता स्वस्त दरात मिळणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 03:45 PM2021-06-14T15:45:23+5:302021-06-14T15:46:51+5:30

१५ जून पासून हा लिलाव सुरू करण्यात येणार आहे. या मालमत्तेत निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषी मालमत्ता स्वस्त दरात मिळणार आहेत.

PNB mega e-auction for properties: Check the date and other details here | बाजारभावापेक्षा स्वस्त घर खरेदी करण्याची संधी; १५ जूनपासून PNB विकतेय १२८६५ घरं अन् शेतजमिनी

बाजारभावापेक्षा स्वस्त घर खरेदी करण्याची संधी; १५ जूनपासून PNB विकतेय १२८६५ घरं अन् शेतजमिनी

Highlightsबँकेकडून १२ हजार ८६५ निवासी मालमत्ता लिलावात येणार आहेत. तर २ हजार ८०८ व्यावसायिक मालमत्ता आहे.ज्या मालमत्ताधारकांनी त्यांचे कर्ज फेडले नाही अथवा कोणत्या कारणामुळे ते फेडू शकले नाहीत तर बँक त्यांची मालमत्ता ताब्यात घेते.बँक या मालमत्तेचा लिलाव करतं. या लिलावातून मिळणाऱ्या रक्कमेतून बँक पैसे वसूल करतं.

नवी दिल्ली – जर तुम्ही बाजारभावापेक्षा कमी दरात घर अथवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आलेली आहे. देशातील दुसरी सर्वांत मोठी सरकारी बँक पीएनबीनं ही खास ऑफर आणली आहे. पंजाब नॅशनल बँक(Punjab National Ban) त्यांच्याकडील मालमत्तेचा लिलाव करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

१५ जून पासून हा लिलाव सुरू करण्यात येणार आहे. या मालमत्तेत निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषी मालमत्ता स्वस्त दरात मिळणार आहेत. तुम्ही यात कसा सहभाग घेऊ शकता हे जाणून घेऊया. ज्या मालमत्ता बँकेच्या डिफॉल्ट यादीत आलेल्या आहेत अशा मालमत्तांचा लिलाव बँकेकडून केला जाणार आहे. Indian Banks Auctions Mortgaged Properties कडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

बँकेने केले ट्विट

पंजाब नॅशनल बँक(PNB) ने ट्विट करून ग्राहकांना ही माहिती दिली आहे. त्या ट्विटमध्ये म्हटलंय की, जर तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करू इच्छिता तर तुम्ही १५ जून २०२१ रोजी होणाऱ्या मेगा ई लिलावात सहभाग घ्यावा. या लिलावात निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता तुम्ही स्वस्त दरात खरेदी करू शकता.

किती मालमत्तेचा लिलाव होणार?

यावेळी बँकेकडून १२ हजार ८६५ निवासी मालमत्ता लिलावात येणार आहेत. तर २ हजार ८०८ व्यावसायिक मालमत्ता आहे. १ हजार ४०३ औद्योगिक मालमत्ता आहेत तर १०१ शेत जमिनी आहेत. या सर्व मालमत्तेचा लिलाव बँकेकडून करण्यात येणार आहे.

बोली लावणाऱ्यांना पहिल्यांदा या गोष्टींची पुर्तता करावी लागेल

रजिस्ट्रेशन – प्रथम तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल आयडीचा वापर करून E Auction प्लॅटफोर्मवर रजिस्ट्रेशन करावं लागेल.

केवायसी व्हेरिफिकेशन – त्यानंतर तुम्हाला आवश्यक केवायसी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ही कागदपत्रे ई लिलाव आयोजकांकडून तपासली जातील. त्यासाठी कमीत कमी २ दिवसांचा कालावधी लागेल.

EMD अमाऊंट ट्रान्सफर – यानंतर तुम्हाला E Auction प्लॅटफोर्मवर जनरेट चलानचा वापर करण्यासाठी अमाऊंट ट्रान्सफर करावी लागेल. तुम्ही NEFT/RTGS याचा वापर करू शकता.

बिडिंग प्रोसेस आणि ऑक्शन रिझल्ट – इच्छुक गुंतवणूकदार पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर E Auction प्लॅटफोर्मवर ऑनलाईन बोली लावू शकतं.

बँक वेळोवेळी मालमत्ता लिलाव करतं

ज्या मालमत्ताधारकांनी त्यांचे कर्ज फेडले नाही अथवा कोणत्या कारणामुळे ते फेडू शकले नाहीत तर बँक त्यांची मालमत्ता ताब्यात घेते. त्यानंतर बँक या मालमत्तेचा लिलाव करतं. या लिलावातून मिळणाऱ्या रक्कमेतून बँक पैसे वसूल करतं. मालमत्ता लिलावाबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास https://ibapi.in/ या लिंकवर क्लि करा.

Web Title: PNB mega e-auction for properties: Check the date and other details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.