lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Opening Bell: दोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स-निफ्टीत तेजी; आयशर मोटर्समध्ये तेजी, टायटन घसरला

Opening Bell: दोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स-निफ्टीत तेजी; आयशर मोटर्समध्ये तेजी, टायटन घसरला

शेअर बाजाराचे कामकाज गुरुवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 260 अंकांच्या वाढीसह 73203 अंकांच्या पातळीवर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 09:40 AM2024-04-18T09:40:40+5:302024-04-18T09:40:54+5:30

शेअर बाजाराचे कामकाज गुरुवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 260 अंकांच्या वाढीसह 73203 अंकांच्या पातळीवर उघडला.

Opening Bell Sensex Nifty up after two day decline Eicher Motors booms Titan slumps | Opening Bell: दोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स-निफ्टीत तेजी; आयशर मोटर्समध्ये तेजी, टायटन घसरला

Opening Bell: दोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स-निफ्टीत तेजी; आयशर मोटर्समध्ये तेजी, टायटन घसरला

Stock Market Open: शेअर बाजाराचे कामकाज गुरुवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 260 अंकांच्या वाढीसह 73203 अंकांच्या पातळीवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 64 अंकांच्या वाढीसह 22212 अंकांच्या पातळीवर उघडला आहे. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात पॉवर ग्रिड, बीपीसीएल, एचडीएफसी लाईफ, टाटा स्टील, ओएनजीसी, हिंदाल्को आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स वधारले तर, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, टायटन, ॲक्सिस बँक, अपोलो हॉस्पिटल, टेक महिंद्रा आणि सन फार्माच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.
 

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती काय?
 

गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजाबाबत बोलायचं झालं तर निफ्टी आयटी वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, विप्रो, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे शेअर्स वधारले तर इन्फोसिस आणि एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
 

प्री ओपनिंगमध्ये बाजाराची स्थिती
 

गुरुवारी प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 239 अंकांच्या वाढीसह 73183 अंकांच्या पातळीवर काम करत होता, तर निफ्टी 64 अंकांच्या वाढीसह 22212 अंकांच्या पातळीवर काम करत होता. शेअर बाजारातील कामकाज सामान्य नोटवर सुरू होऊ शकतं, असे संकेत मइळत होते. आशियाई शेअर बाजारात संमिश्र कल दिसून आला. अमेरिकेतील महागाईचा दर आणि मध्यपूर्वेतील देशांमध्ये वाढलेला तणाव, मॉरिशसमधील गुंतवणुकीवर अधिक स्क्रुटनीच्या बातम्यांमुळे शेअर बाजारात विक्रीचा कल निर्माण झाला आहे, त्यामुळे मंगळवारीही शेअर बाजारात घसरण दिसून आली होती.

Web Title: Opening Bell Sensex Nifty up after two day decline Eicher Motors booms Titan slumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.