lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > OLA कंपनीला अच्छे दिन! १० वर्षांत पहिल्यांदाच नोंदवला नफा; IPO ची सर्वांना प्रतिक्षा

OLA कंपनीला अच्छे दिन! १० वर्षांत पहिल्यांदाच नोंदवला नफा; IPO ची सर्वांना प्रतिक्षा

कंपनी सुरू केल्यानंतर दहा वर्षांनी नफ्यात येणे ही गोष्ट ओलासाठी खूप महत्त्वाची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 08:55 PM2021-11-03T20:55:54+5:302021-11-03T20:57:53+5:30

कंपनी सुरू केल्यानंतर दहा वर्षांनी नफ्यात येणे ही गोष्ट ओलासाठी खूप महत्त्वाची आहे.

ola reports first ever operating profit of rs 90 cr in FY21 | OLA कंपनीला अच्छे दिन! १० वर्षांत पहिल्यांदाच नोंदवला नफा; IPO ची सर्वांना प्रतिक्षा

OLA कंपनीला अच्छे दिन! १० वर्षांत पहिल्यांदाच नोंदवला नफा; IPO ची सर्वांना प्रतिक्षा

नवी दिल्ली:ओला कंपनीला आताच्या घडीला अच्छे दिन आल्याचे पाहायला मिळत आहे. मूळ कंपनी एएनआय टेक्नॉलॉजीजने (ANI Technologies) १० वर्षांत पहिल्यांदाच नफा नोंदवला आहे. असे असले तरी कंपनीचा महसूल ६५ टक्क्यांनी घसरून ६८९.६१ कोटींवर आला आहे. कोरोना संकटामुळे कंपनीच्या महसुलात मोठी घट झाल्याचे सांगितले जात आहे. 

एएनआय टेक्नॉलॉजीजने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ८९.९२ कोटी रुपये नफा (ऑपरेटिंग प्रॉफिट) कमावला आहे. कंपनी सुरू केल्यानंतर दहा वर्षांनी नफ्यात येणे ही गोष्ट ओलासाठी खूप महत्त्वाची आहे. कंपनी लवकरच आपला आयपीओ आणणार आहे. आयपीओसाठी कंपनी डिसेंबरमध्ये सेबीकडे ड्राफ्ट पेपर सादर करू शकते, असे सांगितले जात आहे.

अन्न वितरण आणि आर्थिक सेवा देखील पुरवते

ओलाची मूळ कंपनी अन्न वितरण आणि आर्थिक सेवा देखील पुरवते. २०२०-२१ या आर्थिक वर्षात कंपनीचा ऑपरेटिंग तोटा ४२९.२० रुपयांवर आला आहे, पण महसुलात ६३ टक्के घट झाली आहे आणि ही घट ९८३.१५ रुपयांवर आली आहे. सन २०१० मध्ये भाविश अग्रवाल यांनी ओलाची स्थापना केली होती. सुप्रसिद्ध गुंतवणूक कंपनी सॉफ्टबँक समर्थित ओला पुढील काही महिन्यांत आपला आयपीओ करणार आहे. 

किमान ७५०० कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस

आयपीओमधून ओला कंपनीने किमान ७५०० कोटी रुपये उभारण्याचा मानस ठेवला आहे. ओलाने ग्रॉस मर्चेंडाईज व्हॅल्यू (GMV) ३१ ऑगस्ट रोजी प्री-कोरोना पातळी ओलांडली होती. देशवासीयांचे दळणवळण खूप वाढू लागल्याचा फायदा कंपनीला मिळत आहे, असे अग्रवाल म्हणाले होते.

दरम्यान, ओलाने इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश केला असून, १० नोव्हेंबरपासून इलेक्ट्रिक स्कूटर टेस्ट राइडसाठी उपलब्ध असतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ओला इलेक्ट्रिकने आपल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर एस 1 आणि एस 1 प्रो या १५ ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात १ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच केल्या आहेत. या दोन्ही स्कूटर लाँच झाल्यानंतर एक महिन्यानंतर ओला इलेक्ट्रिकने दोन दिवसांसाठी त्यांची बुकिंग उघडली. 
 

Web Title: ola reports first ever operating profit of rs 90 cr in FY21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.