यशवंत पाध्ये यांचे निधन
By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:35+5:302014-10-04T22:55:35+5:30

यशवंत पाध्ये यांचे निधन
>पुणे : ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत पाध्ये (74) यांचे शनिवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाल़े त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आह़े पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल़े पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात नेहमी पुढे असणारे पाध्ये हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील होते. अर्थशास्त्रात बी़ ए़ केल्यानंतर त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी स्वीकारली. 36 वर्षे नोकरी करीत असतानाच साहित्य, पत्रकारितेच्या क्षेत्रात ते अखंड कार्यरत होत़े महाराष्ट्र संपादक परिषद या राज्य स्तरावरील संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होत़े सध्या ते कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत होत़े पाच दशकांत त्यांनी 50 पुस्तके लिहिली. त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केल़े पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील 25 हून अधिक संस्था, समित्यांमध्ये सदस्य, पदाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचे पहिले राष्ट्रीय स्मारक पोंभुर्ले या त्यांच्या जन्मगावी लोकवर्गणी व शासनाच्या मदतीमधून उभारणीमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होत़े (प्रतिनिधी)----------------------------------------फोटो : 04 यशवंत पाध्ये..एफटीपी..----------------------------------------फोटो पुण्याने पाठविला आहे. ---------------------------