lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विलीनीकरणात युनायटेड बँक ऑफ इंडियाचे अस्तित्व संपणार?

विलीनीकरणात युनायटेड बँक ऑफ इंडियाचे अस्तित्व संपणार?

यूबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या बँकेचे बंगालशी ऐतिहासिक लागेबांधे आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 02:15 AM2020-02-22T02:15:22+5:302020-02-22T02:15:51+5:30

यूबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या बँकेचे बंगालशी ऐतिहासिक लागेबांधे आहेत

Will United Bank of India cease to exist in merger? | विलीनीकरणात युनायटेड बँक ऑफ इंडियाचे अस्तित्व संपणार?

विलीनीकरणात युनायटेड बँक ऑफ इंडियाचे अस्तित्व संपणार?

कोलकता : तीन बँकांचे प्रस्तावित विलीनीकरण करताना, युनायटेड बँक आॅफ इंडियाची (यूबीआय) ओळख कायम न ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे बँकेच्या समभागधारक सर्व हितधारक (स्टेकहोल्डर) नाराजी व्यक्त करीत आहेत. ही बँक दीर्घकाळापासून बंगालची ओळख आहे. विलीनीकरणात ती ओळखच संपणार असल्याची भीती हितधारकांकडून व्यक्त केली जात आहे.

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), यूबीआय आणि ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स (ओबीसी) यांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे. विलीनीकरणात पीएनबी ही अँकर बँक असेल. यातून निर्माण होणारी नवी बँक १ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे. विलीनीकरणानंतर एसबीआयनंतर देशातील ही दुसरी मोठी बँक ठरणार आहे.

यूबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या बँकेचे बंगालशी ऐतिहासिक लागेबांधे आहेत. कोमिला बँकिंग कॉर्पोरेशन नावाने १९१४ मध्ये स्थापन झालेली ही बँक १९५० मध्ये तीन बँकांच्या विलीनीकरणानंतर युनायटेड बँक आॅफ इंडिया लिमिटेड बनली. पुढे १९६९च्या राष्ट्रीयीकरणानंतर तिचे नाव युनायटेड बँक आॅफ इंडिया असे झाले. हे नावच पुसले जाणार असल्यामुळे हितधारक नाराज आहेत.
पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच म्हटले होते की, विलीनीकरणानंतर आपले नाव बदलले जाणार नाही. विलीनीकरणाबाबत विचारता यूबीआय अधिकाºयाने सांगितले की, आम्ही सरकारच्या अधिसूचनेची वाट पाहत आहोत. मंत्रिमंडळाने याचा निर्णय घ्यायचा आहे. आम्ही मंत्रिमंडळाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. (वृत्तसंस्था)

मागणी रेटण्याचा प्रयत्न
आॅगस्ट, २०१९ मध्ये विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून नव्या बँकेत आपले नाव कायम राखण्याची मागणी यूबीआयकडून करण्यात येत आहे.
अधिकाºयाने सांगितले की, आम्हाला निर्णय स्वीकारावाच लागणार आहे. एका विशिष्ट बिंदूपर्यंतच आम्ही आमची मागणी रेटून धरू शकतो.

Web Title: Will United Bank of India cease to exist in merger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.