Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पिंपळगाव परिसरात जंगली प्राण्यांचा उपद्रव

पिंपळगाव परिसरात जंगली प्राण्यांचा उपद्रव

पांगिरे : पिंपळगाव (ता. भुदरगड) परिसरातील शिवारात गवे रेडे तसेच अन्य जंगली जनावरांचा मुक्त संचार वाढला आहे. नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतातील संपूर्ण पिके उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकर्‍यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. वनखाते मात्र हातावर हात धरून बसले असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. गवे रेड्यांच्या बंदोबस्तासाठी वनखात्याने तत्काळ उपाययोजना करावी, अन्यथा वनखात्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे भुदरगड उपतालुकाप्रमुख अशोक पाटील यांनी दिला आहे.

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:14+5:302014-11-21T22:38:14+5:30

पांगिरे : पिंपळगाव (ता. भुदरगड) परिसरातील शिवारात गवे रेडे तसेच अन्य जंगली जनावरांचा मुक्त संचार वाढला आहे. नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतातील संपूर्ण पिके उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकर्‍यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. वनखाते मात्र हातावर हात धरून बसले असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. गवे रेड्यांच्या बंदोबस्तासाठी वनखात्याने तत्काळ उपाययोजना करावी, अन्यथा वनखात्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे भुदरगड उपतालुकाप्रमुख अशोक पाटील यांनी दिला आहे.

Wild animals' disorder in Pimpalgaon area | पिंपळगाव परिसरात जंगली प्राण्यांचा उपद्रव

पिंपळगाव परिसरात जंगली प्राण्यांचा उपद्रव

ंगिरे : पिंपळगाव (ता. भुदरगड) परिसरातील शिवारात गवे रेडे तसेच अन्य जंगली जनावरांचा मुक्त संचार वाढला आहे. नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतातील संपूर्ण पिके उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकर्‍यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. वनखाते मात्र हातावर हात धरून बसले असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. गवे रेड्यांच्या बंदोबस्तासाठी वनखात्याने तत्काळ उपाययोजना करावी, अन्यथा वनखात्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे भुदरगड उपतालुकाप्रमुख अशोक पाटील यांनी दिला आहे.
किल्ले भुदरगड परिसरात पवनचक्की प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या पवनउर्जा प्रकल्पासाठी झाडांची कत्तल करण्यात आली आहे. जंगलात चारा उपलब्ध होत नसल्याने जंगली जनावरांची जगण्या-मरण्याची धडपड सुरू आहे. वनखात्याकडून पर्यावरणाच्या झालेल्या हानीकडे आणि वन्यजिवांच्या उपजिविकेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
पिंपळगाव परिसरातील झुलपेवाडी, बेगवडे, बेलेवाडी परिसरात साधारणत: ४० ते ५० गावांमध्ये रेड्यांचा कळप दाखल झाला आहे. हे गवे दिवसा जंगलात थांबतात व रात्री चरण्यासाठी शेतात येऊन पिकांचे नुकसान करतात. सध्या शेतात जोंधळा, भुईमूग यासारख्या पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रात्री काही शेतकरी पिकांची राखण करण्यासाठी शेतावर जातात. गव्यांचा कळप आल्यास हाका घालणे, फटाके वाजविणे असे प्रकार करतात. मात्र गवे न घाबरता माणसांच्या दिशेने येतात. त्यामुळे वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Wild animals' disorder in Pimpalgaon area