lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > IPO आणण्यापूर्वी Swiggy नं का बदललं आपलं नाव? आता 'या' नावानं ओळखली जाणार कंपनी

IPO आणण्यापूर्वी Swiggy नं का बदललं आपलं नाव? आता 'या' नावानं ओळखली जाणार कंपनी

बंगळुरू स्थित फूड अँड ग्रोसरी डिलिव्हरी ॲप स्विगीनं आपलं रजिस्टर्ड नाव बदललं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 03:36 PM2024-02-29T15:36:38+5:302024-02-29T15:36:57+5:30

बंगळुरू स्थित फूड अँड ग्रोसरी डिलिव्हरी ॲप स्विगीनं आपलं रजिस्टर्ड नाव बदललं आहे.

Why did Swiggy change its name before IPO Now the company will be known by this name know details | IPO आणण्यापूर्वी Swiggy नं का बदललं आपलं नाव? आता 'या' नावानं ओळखली जाणार कंपनी

IPO आणण्यापूर्वी Swiggy नं का बदललं आपलं नाव? आता 'या' नावानं ओळखली जाणार कंपनी

बंगळुरू स्थित फूड अँड ग्रोसरी डिलिव्हरी ॲप स्विगीनं आपलं रजिस्टर्ड नाव बदललं आहे. भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर स्विगीचं नाव बंडल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड असं Bundl Technologies Pvt Ltd वरून बदलण्यात आलंय. आता ते स्विगी प्रायव्हेट लिमिटेड (Swiggy Pvt Ltd) असं करण्यात आलं आहे. बंगळूरू स्थित कंपनीला या महिन्याच्या सुरुवातीला नाव बदलण्यासाठी आरओसीकडून मंजुरी मिळाली होती.
 

वास्तविक स्विगी आपला आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यावर्षी आयपीओ लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याचा या आयपीओची साईज सुमारे 100 कोटी डॉलर्स असू शकते. स्विगीची प्रतिस्पर्धी झोमॅटोनं 2021 मध्ये शेअर बाजारात प्रवेश केला. तेव्हापासून स्विगीने आयपीओ लॉन्च करण्याची योजना आखली आहे. झोमॅटोच्या लिस्टिंगमुळे स्विगीला अनेक गोष्टी समजण्यास मदत झाली आहे.
 

स्विगीनं नोंदणीकृत नाव बदलण्यामागचं एक कारण म्हणजे आयपीओ लॉन्च करणं. नाव बदलल्यानं स्विगीला कंपनीच्या कॉर्पोरेट नावाची ओळख स्थापन करण्यास मदत होईल. स्विगी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस आयपीओसाठी मसुदा दाखल करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचं मुख्य उद्दिष्ट त्याच्या खर्चात कपात करताना चांगला नफा मिळवणं आहे. मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात स्विगीचा ऑपरेटिंग महसूल वार्षिक 45 टक्क्यांनी वाढून 8,265 कोटी रुपये झाला आहे. दरम्यान, या कालावधीत कंपनीचा निव्वळ तोटा 15 टक्क्यांनी वाढून 4,179 कोटी रुपये झाला आहे. फूड डिलिव्हरीशिवाय, कंपनी स्विगी इंस्टामार्ट ब्रँड अंतर्गत ग्रोसरीदेखील डिस्ट्रिब्यूट करते.
 

यावर्षी झालेली सुरुवात

 

नंदन रेड्डी आणि श्रीहर्ष मजेती यांनी २०१४ मध्ये बंडल टेक्नॉलॉजीजची (Bundl Technologies Pvt) स्थापना केली होती. सध्या श्रीहर्ष मॅजेती हे फर्मचे सीईओ आहेत. रिपोर्टनुसार, स्विगी भविष्यात आपला नफा वाढवण्यासाठी आणखी काही पावलं उचलू शकते.

Web Title: Why did Swiggy change its name before IPO Now the company will be known by this name know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.