Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट

RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट

Paytm Stock Price Target: पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा परवाना रद्द झाल्यानंतर बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. पाहा काय म्हटलंय ब्रोकरेजनं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 14:59 IST2026-04-25T14:58:14+5:302026-04-25T14:59:53+5:30

Paytm Stock Price Target: पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा परवाना रद्द झाल्यानंतर बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. पाहा काय म्हटलंय ब्रोकरेजनं....

What will happen to Paytm shares after RBI s big move Broker gives shocking target said overperformed | RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट

RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट

Paytm Stock Price Target: पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) चा परवाना रद्द झाल्यानंतर बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. मात्र, विशेष बाब अशी की, या मोठ्या धक्क्यांनंतरही पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी 'वन ९७ कम्युनिकेशन्स'साठी आशा पूर्णपणे मावळलेल्या नाहीत. ब्रोकरेज संस्था बर्नस्टीननं (Bernstein) स्पष्ट केलंय की, ही बातमी चिंताजनक असली तरी कंपनीची दीर्घकालीन वाढीची शक्यता अजूनही जिवंत आहे. याच कारणामुळे त्यांनी ₹१,५०० ची टार्गेट प्राईज त्यांनी कायम ठेवली आहे, जी सध्याच्या स्तरापेक्षा सुमारे ३०% वाढ दर्शवते.

RBI ने इतका कठोर निर्णय का घेतला?

भारतीय रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड विरुद्ध ही कारवाई सुमारे दोन वर्षांच्या तपासणीनंतर केली आहे. जानेवारी २०२४ मध्येच बँकेला नवीन ठेवी स्वीकारण्यास मज्जाव करण्यात आला होता. RBI च्या मते, निधीचा वापर आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधांशी संबंधित नियमांचं गंभीर उल्लंघन आढळलंय. केंद्रीय बँकेनं असंही म्हटलंय की, बँकेचं कामकाज ठेवीदारांच्या आणि सार्वजनिक हिताच्या विरोधात होतं आणि ते पुढे चालू ठेवणं कोणाच्याही हिताचं ठरणार नाही.

जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर

सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, यामुळे पेटीएमच्या व्यवसायावर परिणाम होईल का? बर्नस्टीनच्या मते, याचा थेट परिणाम अत्यंत मर्यादित असेल, कारण २०२४ पासूनच पेटीएमनं पीपीबीएल (PPBL) पासून आपला व्यवसाय पूर्णपणे वेगळा केला होता. कंपनीनं बँकेतील आपली गुंतवणूक आधीच 'राइट-ऑफ' केली आहे, त्यामुळे आता कोणत्याही मोठ्या आर्थिक धक्क्याची शक्यता नाही.

कंपनीचं स्पष्टीकरण

वन ९७ कम्युनिकेशन्सनं स्पष्ट केलंय की, त्यांच्या सर्व सेवा जसे की पेटीएम ॲप, यूपीआय, पेटीएम गोल्ड, क्यूआर, साउंडबॉक्स आणि पेमेंट गेटवे पूर्वीप्रमाणेच कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहतील. कंपनीनं हे देखील सांगितलंय की, पेटीएम पेमेंट्स बँक ही एक स्वतंत्र संस्था आहे आणि त्याच्या व्यवस्थापनात किंवा बोर्डात कंपनीची कोणतीही थेट भूमिका नाही.

गुंतवणूकदारांसाठी आशेचा किरण काय?

बर्नस्टीनच्या मते, ही संपूर्ण घटना पेटीएमसाठी एका नवीन संधीचा मार्ग उघडू शकते. आता कंपनी NBFC किंवा PPI परवान्यासाठी अर्ज करू शकते, ज्यामुळे ती आपली पेमेंट आणि क्रेडिट उत्पादनं अधिक मजबूत करू शकेल. म्हणजेच, एकीकडे बँकिंग व्यवसाय बंद झाला असताना दुसरीकडे नवीन बिझनेस मॉडेलच्या शक्यता निर्माण होत आहेत.

शेअर्सची स्थिती आणि भविष्यातील संकेत

पेटीएमच्या शेअरनं गेल्या एका वर्षात सुमारे २६% परतावा देऊन निफ्टी आणि सेन्सेक्स पेक्षा चांगली कामगिरी केली आहे. आता कंपनी नवीन परवाना आणि व्यवसाय धोरणाद्वारे आपली वाढ कशी कायम राखते, याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष असेल. RBI चं हे पाऊल पेटीएमसाठी एक मोठा धक्का नक्कीच आहे, पण ही बाब इथेच संपत नाही. खरा प्रश्न हा आहे की, पेटीएम या संकटाचं संधीत रूपांतर करू शकेल का? जर कंपनी नवीन नियामक मार्ग शोधण्यात यशस्वी ठरली, तर ही घसरण दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीची सुरुवात देखील ठरू शकते.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : पेटीएम स्टॉक: आरबीआई के झटके के बाद ब्रोकरेज का चौंकाने वाला लक्ष्य

Web Summary : आरबीआई की कार्रवाई के बावजूद, बर्नस्टीन पेटीएम पर सकारात्मक है। एनबीएफसी या पीपीआई लाइसेंस के माध्यम से नए व्यापार मॉडल की संभावनाओं और सीमित प्रभाव का हवाला देते हुए ₹1,500 का लक्ष्य मूल्य बरकरार रखा। पेटीएम की मुख्य सेवाएं चालू हैं।

Web Title : Paytm Stock: RBI Shock, Brokerage Target Surprises. What's Next?

Web Summary : Despite RBI's action against Paytm Payments Bank, Bernstein maintains a positive outlook. They retain a target price of ₹1,500, citing limited impact and potential for new business models via NBFC or PPI licenses. Paytm's core services remain operational.