lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोनाशी युद्ध : बीएसएनएलची महिनाभरासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा

कोरोनाशी युद्ध : बीएसएनएलची महिनाभरासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा

भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या सगळ्या लँडलाइन ग्राहकांना एक महिन्यासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 05:56 AM2020-03-21T05:56:55+5:302020-03-21T05:57:09+5:30

भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या सगळ्या लँडलाइन ग्राहकांना एक महिन्यासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे.

War with Corona: BSNL Give free month-long broadband service | कोरोनाशी युद्ध : बीएसएनएलची महिनाभरासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा

कोरोनाशी युद्ध : बीएसएनएलची महिनाभरासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा

- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : कोरोनाशी लढण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने घरी बसून काम करावे आणि विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास करावा यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या सगळ्या लँडलाइन ग्राहकांना एक महिन्यासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे. यासाठी एक अट अशी की, त्या ग्राहकाकडे आधीपासून इतर कोणत्याही कंपनीची ब्रॉडबँड जोडणी असायला नको.
बीएसएनएलचे सीएफए विवेक बंजाल म्हणाले की, या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना टोल फ्री नंबर १८००३४५१५०४ वर कॉल करावा लागेल. बंजाल यांनी सांगितले की, हे पाऊल सोशल डिस्टन्सिंग निर्माण करण्याच्या उद्देशाने उचलले गेलेले पाऊल आहे. त्यांनी कार्यालयांत न जाता घरूनच काम करावे. शाळांनाही सुट्या आधीच जाहीर झालेल्या आहेत. गर्दी न करण्याचे आवाहन अंमलात आण, असे बंजाल म्हणाले.

Web Title: War with Corona: BSNL Give free month-long broadband service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.