एाने स्वत:ला वाचविले, पुन्हा सुरक्षेचा प्रश्नऔरंगाबाद : येथील हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेले तीनपैकी दोन तरुण बुडाले, तर एकाने वेळीच स्वत:ला सावरल्याने तो बालंबाल बचावला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जाधववाडी येथील रहिवासी रोहित राजाभाऊ शिंदे (२४) आणि सारा वैभव येथील निवासी कृष्णा देवलाल निंभोरे (२४) हे दोघे काही दिवसांपूर्वी एका कॉल सेंटरमध्ये काम करीत होते, त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री झाल्याने ते सोबत फिरत असत. दरम्यान, रोहितचा मुंबईतील मित्र डॅनी त्याला भेटण्यासाठी औरंगाबादेत आला होता. डॅनी आणि रोहित सोबतच कृष्णा याच्या घरी गेले. त्यानंतर तेथून ते तिघेजण हर्सूल तलावावर फिरायला गेले. यावेळी गप्पा मारत असताना तिघेही पोहण्यासाठी तलावात उतरले. पोहत असताना तलावाच्या मध्यापर्यंत गेले, तेथे रोहित आणि डॅनी बुडायला लागले, यावेळी काठाजवळ पोहत असलेल्या कृष्णाने हा प्रकार पाहिला. त्यांना वाचविण्यासाठी तो तिकडे धावला; मात्र तोपर्यंत ते बुडाले होते. त्यानंतर तो तातडीने पाण्याबाहेर आला आणि आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्याच्या आवाजाने लोक जमा झाले. या घटनेची माहिती मनपा अग्निशामक दलास कळविण्यात आली. अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस यांनी बॅटरीचा वापर करून बुडालेल्या रोहित आणि डॅनी यांचा शोध घेतला. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रोहित आणि डॅनी यांचे मृतदेह घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. डॅनी हा रोहितचा मित्र होता. त्याचे पूर्ण नाव कृष्णाला माहीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.चौकटआतापर्यंत २५ जणांचा मृत्यूसूत्राने सांगितले की, हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सुमारे २५ तरुणांचा डुबून मृत्यू झाला. ७ एप्रिल रोजी नॅशनल बुर्हाणी शाळेतील दहावीत शिकत असलेल्या सय्यद जुनेद कादरी सय्यद फैै जोद्दीन कादरी, सैयद जुनेद कादरी सैयद फैजोद्दीन कादरी (१६, रा.जुनाबाजार), सय्यद जबी इस्माईल हुसोमोद्दीन युसूफ (रा.बुढीलेन), ओसामा मोहम्मद जमीर (रा.रोहिला गल्ली) आणि सय्यद मुस्तकीन सय्यद सलीम (रा.रहिमनगर) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर तेथे काही दिवसांपूर्वी एका विवाहितेने आत्महत्या केली होती. याशिवाय शेख जावेद शेख तय्यब (१९, रा.भांडुप) या तरुणाचाही तेथे मृत्यू झाला होता.
हर्सूल तलावात दोन तरुण बुडाले, एक जण वाचला.
एकाने स्वत:ला वाचविले, पुन्हा सुरक्षेचा प्रश्न
By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST2014-08-16T22:24:53+5:302014-08-16T22:24:53+5:30
एकाने स्वत:ला वाचविले, पुन्हा सुरक्षेचा प्रश्न
