Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹592 पर्यंत जाणार हा शेअर? एक्सपर्ट्सनी दिला खरेदीचा सल्ला; रेखा झुनझुनवाला यांच्याकडेही 50 लाख शेअर्स

₹592 पर्यंत जाणार हा शेअर? एक्सपर्ट्सनी दिला खरेदीचा सल्ला; रेखा झुनझुनवाला यांच्याकडेही 50 लाख शेअर्स

ब्रोकरेज फर्म शेयरखानने VA Tech Wabag वर खरेदी रेटिंग दिले आहे. हा शेअर 520 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सुनिधि सिक्योरिटीजनेदेखील या शेअरसाठी 592 रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 05:58 PM2023-06-01T17:58:34+5:302023-06-01T17:59:28+5:30

ब्रोकरेज फर्म शेयरखानने VA Tech Wabag वर खरेदी रेटिंग दिले आहे. हा शेअर 520 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सुनिधि सिक्योरिटीजनेदेखील या शेअरसाठी 592 रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

This share will go up to rs 592 Experts give buying advice Rekha Jhunjhunwala also has 50 lakh shares | ₹592 पर्यंत जाणार हा शेअर? एक्सपर्ट्सनी दिला खरेदीचा सल्ला; रेखा झुनझुनवाला यांच्याकडेही 50 लाख शेअर्स

₹592 पर्यंत जाणार हा शेअर? एक्सपर्ट्सनी दिला खरेदीचा सल्ला; रेखा झुनझुनवाला यांच्याकडेही 50 लाख शेअर्स

गेल्या एका वर्षात, वॉटर ट्रिटमेंटशी संबंधित स्मॉल-कॅप कंपनी VATech Wabag च्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. ही तेजी मजबूत ऑर्डर बुक, मार्जिन विस्तार आदींच्या बळावर आली आहे. Viatech Wabag चा शेअर 31 मे रोजी 85 टक्‍क्‍यांनी वाढून 459.25 रुपयांवर पोहोचला. जो एका वर्षापूर्वी 247.40 रुपयांवर होता. या काळात बेंचमार्क बीएसई सेंसेक्स जवळफास 13 टक्क्यांनी वाढला आहे.

ब्रोकरेजने दिला खरेदीचा सल्ला - 
ब्रोकरेज फर्म शेयरखानने VA Tech Wabag वर खरेदी रेटिंग दिले आहे. हा शेअर 520 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सुनिधि सिक्योरिटीजनेदेखील या शेअरसाठी 592 रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. याच बरोबर शेअरसाठी खरेदी रेटिंग दिली आहे. अर्थात खरेदीचा सल्ला दिला आहे. शेयरखानच्या मते, कच्च्या मालाची किंमत आणि इतर खर्चात कपात झाल्याने ऑपरेटिंगचा नफा 51.7 टक्क्यांनी वाढून 108 कोटी रुपये झाला आहे. यामुळे कंपनीच्या शेअरसंदर्भात आशा आहे.

असा आहे तिमाही निकाल -
आर्थिक वर्ष 2022-23 (Q4FY23)च्या चौथ्या तिमाहीत कंपनीला 111 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीने गेल्या वर्षी याच काळात 46.30 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. कंपनीची विक्री 3.92 टक्क्यांनी वाढून 926.86 कोटी रुपये झाली आहे. महत्वाचे म्हणजे, मार्च तिमाहीपर्यंत दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 8.04 टक्के अथवा 50 लाख शेअर्स होते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: This share will go up to rs 592 Experts give buying advice Rekha Jhunjhunwala also has 50 lakh shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.