lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > टेस्लाचा प्रकल्प तामिळनाडू, महाराष्ट्र की गुजरातमध्ये? कंपनीचे पथक लवकरच पाहणीसाठी भारतात

टेस्लाचा प्रकल्प तामिळनाडू, महाराष्ट्र की गुजरातमध्ये? कंपनीचे पथक लवकरच पाहणीसाठी भारतात

Tesla Project: अमेरिकेची आघाडीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला भारतात आपला प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्सुक असून महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात यापैकी एका राज्यात कंपनीचा प्रकल्प उभा राहण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 06:24 AM2024-04-05T06:24:48+5:302024-04-05T06:25:25+5:30

Tesla Project: अमेरिकेची आघाडीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला भारतात आपला प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्सुक असून महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात यापैकी एका राज्यात कंपनीचा प्रकल्प उभा राहण्याची शक्यता आहे.

Tesla project in Tamil Nadu, Maharashtra or Gujarat? A team of the company will soon visit India for inspection | टेस्लाचा प्रकल्प तामिळनाडू, महाराष्ट्र की गुजरातमध्ये? कंपनीचे पथक लवकरच पाहणीसाठी भारतात

टेस्लाचा प्रकल्प तामिळनाडू, महाराष्ट्र की गुजरातमध्ये? कंपनीचे पथक लवकरच पाहणीसाठी भारतात

नवी दिल्ली -  अमेरिकेची आघाडीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाभारतात आपला प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्सुक असून महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात यापैकी एका राज्यात कंपनीचा प्रकल्प उभा राहण्याची शक्यता आहे. प्रकल्प कोठे स्थापन करायचा याचा शोध घेण्यासाठी कंपनीचे एक पथक या महिन्याच्या अखेरीस भारतात येणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मंदावत असून अमेरिका व चीनच्या बाजारात टेस्लास मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. मागणी घटल्यामुळे पहिल्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत घसरण पाहायला मिळाली आहे. (वृत्तसंस्था)

३ अब्ज डॉलर्सची होणार गुंतवणूक?
एका वृत्तानुसार, प्रकल्पासाठी आधीच वाहन उद्योग असणाऱ्या राज्यांना टेस्लाचे पथक प्राधान्य देणार आहे. यात महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या प्रकल्पात टेस्लाकडून ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Tesla project in Tamil Nadu, Maharashtra or Gujarat? A team of the company will soon visit India for inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.