Lokmat Money > बिझनेस न्यूज > तंत्रज्ञान देईल देशी किमतीत विदेशी सेवा

तंत्रज्ञान देईल देशी किमतीत विदेशी सेवा

भारतीयांना ८० टक्के विदेशी सेवा २० टक्के देशी किमतीत हव्या असतात. केवळ तंत्रज्ञानाच्या आधारेच हे शक्य आहे. त्याआधारे विकसनशील अर्थव्यवस्थेतील ६ अब्ज नागरिकांना येथील उद्योग सेवा देऊ शकतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 03:28 AM2017-12-08T03:28:08+5:302017-12-08T03:28:51+5:30

भारतीयांना ८० टक्के विदेशी सेवा २० टक्के देशी किमतीत हव्या असतात. केवळ तंत्रज्ञानाच्या आधारेच हे शक्य आहे. त्याआधारे विकसनशील अर्थव्यवस्थेतील ६ अब्ज नागरिकांना येथील उद्योग सेवा देऊ शकतील...

Technology will provide foreign service at domestic prices | तंत्रज्ञान देईल देशी किमतीत विदेशी सेवा

तंत्रज्ञान देईल देशी किमतीत विदेशी सेवा

मुंबई : भारतीयांना ८० टक्के विदेशी सेवा २० टक्के देशी किमतीत हव्या असतात. केवळ तंत्रज्ञानाच्या आधारेच हे शक्य आहे. त्याआधारे विकसनशील अर्थव्यवस्थेतील ६ अब्ज नागरिकांना येथील उद्योग सेवा देऊ शकतील, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा म्हणाले. येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (एनएसई) बेंगळुरूमध्ये अलीकडेच तंत्रज्ञान परिषद घेतली. त्यामध्ये कंपन्यांना निधी उभा करण्यासाठी एनएसईच्या तंत्रज्ञान मंचाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
भांडवली बाजार किंवा शेअर बाजार हे कंपन्यांसाठी निधी उभारणीचे सर्वोत्तम साधन आहे. यासाठीच एनएसईने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. अशावेळी ही परिषद भांडवली बाजार व स्टार्ट अप्स यांच्यातील नवीन नात्याची सुरुवात आहे, असे मत एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ विक्रम लिमये यांनी व्यक्त केले.
सेबीचे माजी अध्यक्ष सी.बी. भावे हे सन्माननीय अतिथी होते. ज्येष्ठ उद्योजक टी.व्ही. मोहनदास पै यांच्यासह शेअर बाजाराशी संबंधित अन्य तज्ज्ञ या वेळी उपस्थित होते. तंत्रज्ञानाचा अवलंब करून भांडवली बाजारात कार्यरत असलेल्या देशभरातील १५० स्टार्ट अप्स कंपन्या या परिषदेत सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Technology will provide foreign service at domestic prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.