lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Swiggy चे ग्राहकांना मोठे गिफ्ट; तीन महीने फ्री डिलिव्हरी अन् बंपर डिस्काउंट

Swiggy चे ग्राहकांना मोठे गिफ्ट; तीन महीने फ्री डिलिव्हरी अन् बंपर डिस्काउंट

स्विगीने आपल्या ग्राहकांसाठी वन लाइट मेंबरशिप प्रोग्राम सुरू केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 04:11 PM2023-10-09T16:11:53+5:302023-10-09T16:13:14+5:30

स्विगीने आपल्या ग्राहकांसाठी वन लाइट मेंबरशिप प्रोग्राम सुरू केला आहे.

swiggy-launches-lite-membership-in-just-99-rupees-for-three-months-check-benefits | Swiggy चे ग्राहकांना मोठे गिफ्ट; तीन महीने फ्री डिलिव्हरी अन् बंपर डिस्काउंट

Swiggy चे ग्राहकांना मोठे गिफ्ट; तीन महीने फ्री डिलिव्हरी अन् बंपर डिस्काउंट

Swiggy One Lite membership: फेस्टिव्ह सीझनमध्ये ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggyने आपल्या ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. Swiggy ने आपल्या ग्राहकांसाठी वन मेंबरशिप लॉन्च केली आहे. यासाठी तुम्हाला फक्त 99 रुपये खर्च करावे लागतील. या मेंबरशिपमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळणार आहेत. 

या मेंबरशिपमुळे ऑनलाइन अन्न मागवणाऱ्यांना तीन महिन्यांसाठी फ्री डिलिव्हरी दिली जाणार आहे. यासोबतच ग्राहकांना विशेष ऑफर्ससह सवलतींचाही लाभ घेता येणार आहे. स्विगी वन मेंबरशिपमध्ये ग्राहकांना 10 फ्री फूड डिलिव्हरी दिली जाईल.
 
या तीन महिन्यांच्या मेंबरशिपमध्ये ग्राहकांनी 144 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यास त्यांना 10 मोफत डिलिव्हरी दिली जातील. यासह, तुम्हाला 199 रुपयांपेक्षा जास्त इंस्टामार्ट ऑर्डरवर 10 मोफत डिलिव्हरी मिळतील. इतकंच नाही तर मोफत डिलिव्हरी व्यतिरिक्त, ग्राहकांना 20,000 हून अधिक रेस्टॉरंट्समध्ये नियमित ऑफर व्यतिरिक्त 30 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट दिला जाईल. यासोबतच, One Lite सदस्यांना 60 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या Swiggy Genie डिलिव्हरीवर 10 टक्के सूट मिळेल.

Web Title: swiggy-launches-lite-membership-in-just-99-rupees-for-three-months-check-benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.