lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Cerelac चा 'गोडवा' बाळांसाठी धोक्याचा?; साखरेचं प्रमाण पाहून बसेल धक्का, Nestle पुन्हा अडचणीत

Cerelac चा 'गोडवा' बाळांसाठी धोक्याचा?; साखरेचं प्रमाण पाहून बसेल धक्का, Nestle पुन्हा अडचणीत

जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना फूड सप्लिमेंट म्हणून सेरेलॅक देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 10:24 AM2024-04-18T10:24:08+5:302024-04-18T10:24:39+5:30

जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना फूड सप्लिमेंट म्हणून सेरेलॅक देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

Sugar in Cerelac New report reveals shocking details of how Nestle is selling baby food in India and other countries | Cerelac चा 'गोडवा' बाळांसाठी धोक्याचा?; साखरेचं प्रमाण पाहून बसेल धक्का, Nestle पुन्हा अडचणीत

Cerelac चा 'गोडवा' बाळांसाठी धोक्याचा?; साखरेचं प्रमाण पाहून बसेल धक्का, Nestle पुन्हा अडचणीत

Nestle Product: जगात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या लहान मुलांसाठीही प्रोडक्ट तयार करतात. नेस्ले ही देखील त्यापैकीच एक. जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना फूड सप्लिमेंट म्हणून सेरेलॅक देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जगातील सर्वात मोठी एफएमसी आणि बेबी फॉर्म्युला मॅन्युफॅक्चर नेस्ले कथितरित्या भारत, अन्य आशियाई देश आणि आफ्रिकन देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या बेबी मिल्क आणि फूड सप्लिमेंट सेरेलॅकमध्ये साखर मिसळत असल्याची माहिती समोर आली आहे. पब्लिक आय या स्विस इनव्हेस्टिगेशन ऑर्गनायझेशननं सादर केलेल्या रिपोर्टमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

रिपोर्टनुसार, नेस्लेच्या निडो आणि सेरेलॅकच्या नमुन्यांमध्ये सुक्रोज किंवा मधाच्या स्वरूपात साखरेचं प्रमाण आढळलं आहे. निडो हे एक वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लहान मुलांसाठी दुधाच्या रुपात वापरण्यासाठी आहे, तर सेरेलॅक सहा महिने ते दोन वर्षातील मुलांसाठी वापरलं जातं.
 

कसा झाला खुलासा?
 

जेव्हा संघटनेनं आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या बेबी फूड प्रोडक्टचे सँपल तपासण्यासाठी बेल्जियमच्या प्रयोगशाळेत पाठवले, तेव्हा ही बाब समोर आली.
 

भारतात २५० मिलियन डॉलर्सपेक्षा अधिक विक्री
 

रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की भारतात २०२२ मध्ये विक्री २५० मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. सर्व सेरेलॅक बेबी सेरिल्यच्या प्रत्येक सर्व्हिंगमध्ये सरासरी ३ ग्रॅम अधिक साखर आहे. दक्षिण आफ्रिकेतही हीच परिस्थिती आहे. येथील सर्व सेरेलॅक्समध्ये प्रत्येक सर्व्हिंगमध्ये चार ग्रॅम किंवा त्याहून अधिक साखर आहे.
 

ब्राझिलमध्ये सरासरी ३ ग्राम अधिक साखर
 

ब्राझिलमध्ये तीन चतुर्थांश सेरेलॅक बेबी फूड (येथे मुसिलॉन म्हणून ओळखलं जातं) मध्ये सरासरी अतिरिक्त ३ ग्रॅम सारख आहे. येथे ८ पैकी २ उत्पादनांमध्ये अतिरिक्त साखर आढळली नाही. परंतु अन्य सहा उत्पादनांमध्ये प्रत्येक सर्व्हिंगमध्ये जवळपास ४ ग्राम साखर आढळली. नायजेरियामध्ये हे प्रमाण ६.८ ग्रामपर्यंत होतं.
 

फिलिपिन्समध्ये मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये अतिरिक्त साखर नाही. परंतु इंडोनेशियामध्ये डॅनको या नावानं विकल्या जाणाऱ्या निडो बेबी फूडमध्ये १०० ग्राममध्ये जवळपास२ ग्राम अतिरिक्त साखर किंवा ०.८ ग्राम प्रति सर्व्हिंग होती. 

Web Title: Sugar in Cerelac New report reveals shocking details of how Nestle is selling baby food in India and other countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.